आतंकवादाला प्रोत्साहन देणार्या धर्मांध प्राचार्याला विद्यालयने बडतर्फ केल्याचे प्रकरण
मुंबई – घाटकोपर येथील सोमय्या विद्यालयाच्या प्राचार्या परवीन शेख यांना सोमय्या विद्यालयाने अखेर बडतर्फ केलेे. त्यानंतर विद्यालयाच्या व्यवस्थापनाला येथील काँग्रेसचे नेते मैथ्यू अँटनी यांनी, ‘शेख यांच्या संदर्भात विद्यालयाने घेतलेल्या निर्णयाचे त्याला परिणाम भोगावे लागतील. विद्यापिठाने पक्षपात करू नये आणि कट्टरपंथियांच्या राजकीय प्रभावापासून दूर रहावे’, अशी धमकी दिली आहे.
१. ‘ऑप इंडिया’ संकेतस्थळाने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. परवीन शेख आतंकवादी संघटना हमासप्रमाणेच हिंदुद्वेषी झाकीर नाईक यांचे समर्थन करत होत्या. वर्ष २०२० मध्ये देहलीत झालेल्या हिंदुविरोधी दंगीचेही त्यांनी उघडपणे समर्थन केले होते.
२. शेख यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या ‘पोस्ट’चा आढावा घेण्यात आला असून त्यांची कट्टरतावादी मनोवृत्ती दिसून येते. शेख यांनी श्रीराममंदिराला विरोध केला होता, तसेच हिंदू हे भिकारी असून ते इस्लामी देशांकडे भीक मागतात, अशा आशयो पोस्ट प्रसारित केले होते.
३. ७ मे २०२४ या दिवशी सोमय्या विद्यालयाने शेख यांना काढून टाकले आणि याविषयी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले, ‘व्यवस्थापनाला परवीन शेख यांच्या कृत्यांची कल्पना नव्हती. त्यांची भूमिका पूर्णतः अस्वीकारार्ह आणि चिंताजनक आहे. आम्ही त्यांच्या मतांशी सहमत नाही. आम्ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे समर्थन करतो; परंतु त्यात दुसर्यांचा अवमान ही होता कामा नये, याची काळजी घ्यायला हवी. आम्ही त्यांना त्वरित बडतर्फ करत आहोत.’
४. सोमय्या विद्यालयाच्या व्यवस्थापनाने शेख यांना त्यागपत्र देण्यास सांगितल्यावर त्यांनी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे कारण देत त्यागपत्र देण्यास नकार दिला होता. नुकतेच हिंदु जनजागृती समितीने शासनाच्या शिक्षण विभागाला शेख यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भात निवेदन दिले होते.
संपादकीय भूमिकाकट्टरतावादी मानसिकतेच्या प्राचार्या शेख यांना काढून टाकल्यावर धमकावणारे काँग्रेसचे गुंड मनोवृत्तीचे नेते ! अशा नेत्यांचा भरणा असलेल्या पक्षाच्या हाती देत सुरक्षित कसा राहील ? हे लक्षात घेऊन निवडणुकीत काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी राष्ट्रप्रेमींनी पुढे यावे ! |