संपादकीय : भगव्या रंगाची ‘ॲलर्जी’ !

‘दूरदर्शन’चे नवीन बोधचिन्ह

‘दूरदर्शन’ या शासकीय दूरचित्रवाहिनीने तिच्या बोधचिन्हाचा लाल रंग पालटून आता नारिंगी केला आहे. त्यामुळे दूरदर्शनचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांना ‘वाईट वाटले’ आहे. त्यांनी ती अप्रसन्नता मुद्दामहून उघडपणे व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकार यांना आता पुढील काही गोष्टी सांगणे क्रमप्राप्त होऊन बसले आहे. त्यांना सांगावेसे वाटते की, गेली ६० वर्षे काँग्रेस सरकारच्या हिरवेकरणाच्या धोरणामुळे देशाची जी अतोनात हानी झाली आहे, ती पाहून आम्हालाही पुष्कळ वाईट वाटते. मोहनदास गांधी यांचे हिरवेकरण झाल्याने ते ५५ कोटी पाकिस्तानला द्यायला निघाले होते, त्यांच्यामुळे देशाची फाळणी झाली, त्यामुळे लाखो हिंदूंची हत्या आणि सहस्रो स्त्रियांवर बलात्कार झाले अन् होत आहेत. नौखालीसह आतापर्यंत देशात सहस्रो दंगली झाल्या; पाक, बांगलादेश आदींमधील हिंदू हाताच्या बोटावर मोजण्याइतके राहिले, काश्मीरमध्ये हिंदूंचा वंशविच्छेद झाला…हे सारे पाहून सर्व हिंदूंना पुष्कळ पुष्कळ वाईट वाटत आहे. वर्ष १९७६ मध्ये ‘निधर्मी’ शब्द राज्यघटनेत घुसडण्यात आला, तेव्हाही हिंदूंना पुष्कळ वाईट वाटले. या निधर्मीपणाच्या नावाखाली (नाटक, चित्रपट, संगीत, चित्र आदी) सर्व प्रकारच्या कला, साहित्य, शैक्षणिक अभ्यासक्रम, पत्रकारिता आदी क्षेत्रांतून एक प्रकारे हिंदुद्वेषाचे छुपे धोरण (‘अजेंडा’) राबवले गेले आणि इस्लामीकरणाचा उदोउदो झाला.

इतकी वर्षे मुसलमानांचे लांगूलचालन आणि हिंदूंना अक्षरशः लाथाडणे झाले, ना सरकार हिंदु पीडितांच्या बाजूचे होते, ना पोलीस प्रशासन ! त्यामुळे त्यांना न्याय द्यायला कुणीच नव्हते. इतिहासाची प्रचंड मोठी मोडतोड या सरकारच्या तथाकथित निधर्मीपणाच्या (म्हणजे हिरवेकरणाच्या) धोरणातून झाली, याचे अतीगंभीर परिणाम हिंदूंवर आतापर्यंत झाले. ‘हिंदू आतापर्यंत लढवय्ये होते, त्यांच्यात ‘क्षात्रवृत्ती’ आहे’, हेच ते पूर्णपणे विसरले. पहिले पंतप्रधान नेहरू यांच्या माध्यमातून देशाला त्याच्या मूळ ‘भगव्या’ संस्कृतीपासून दूर ठेवून इंग्रजांनी त्यांचा हेतू साध्य करून घेतला; पण नेहरूंना आणि त्यांच्या नंतरच्या काँग्रेसला हे कळूनही त्यांनी केवळ अन् केवळ ‘हिरवेकरणा’साठी त्यांची स्थिती डोळे, तोंड आणि कान यांवर हात असणार्‍या ३ माकडांसारखी करून घेतली अन् हिंदूंचे काही ऐकून घेतले नाही. यातूनच पुढे गोरक्षणाची विनंती करायला गेलेल्या करपात्री महाराजांची काँग्रेसकडून हत्या झाली. काँग्रेसची देशावरची प्रदीर्घ राजवट हा निधर्मीपणाचा म्हणजे हिरवेपणाचा इतिहास आहे, हे जवाहर सरकार यांनी ध्यानात घ्यावे आणि आता दूरदर्शनच काय; परंतु जे जे भगवे होईल, ते खर्‍या अर्थाने परिष्कृत निधर्मी असेल, हेही त्यांनी समजून घ्यावे. जवाहर यांची खरी अडचण म्हणजे आता या ‘भगवेकरणा’च्या लाटेत त्यांच्यासारख्यांचा निधर्मीपणाच्या नावाखाली चालणारा ‘हिरवेकरणा’चा ‘अजेंडा’ (धोरण) संपुष्टात येणार आहे, ही आहे. भगव्या रंगाकडे कावीळ झाल्याप्रमाणे पहाणार्‍यांनी हे लक्षात घ्यावे की, भगवा रंग खरा सर्वसमावेशक आहे; ढोंगी सर्वधर्मसमभावी नाही. भारतात मुसलमान सर्वाधिक सुरक्षित आणि चांगल्या स्थितीत आहेत, हे सर्वांना ठाऊक आहे. भगवेकरणाचा गंध नसल्याने जवाहर यांच्या बंगाल राज्याची झालेली दुःस्थिती सुधारण्यासाठी त्यांना अंतिमतः भगवेकरणच उपयोगी पडणार आहे. त्यामुळे त्यांना कितीही वाईट वाटले, तरी त्यांच्या आणि त्यांच्या धर्मबांधवांच्या हितासाठी त्यांना ‘भगव्या’वाचून पर्याय नाही, हे सत्य त्यांनी स्वीकारावे !