Stone Pelting Ramnavami:देवपूर (जिल्हा धुळे) येथे रामनवमीच्या मिरणुकीवर धर्मांधांची दगडफेक आणि हिंदूंना मारहाण !

केवळ ४ धर्मांधांवर गुन्हा नोंद  

प्रतिकात्मक चित्र

देवपूर (जिल्हा धुळे) १८ एप्रिल (वार्ता.) – येथे नुराणी मशिदीजवळ आलेल्या रामनवमीच्या मिरवणुकीत श्रीरामाची गाणी वाजवली म्हणून धर्मांधांनी भाविकांवर दगडफेक करून ५ – ६ भाविकांना मारहाणही केली. त्यामुळे हिंदूंची अचानक पळापळ झाली. या घटनेत काही भाविक घायाळ झाले. या प्रकरणी देवपूर पोलिसांनी एकूण ४ जणांवर गुन्हा नोंद केला. ही घटना १८ एप्रिल या दिवशी सकाळी ११.४५ वाजता घडली. (हिंदू केवळ मार खातात, हे माहीत असल्याने धर्मांध त्यांना मारण्यास धजावतात ! – संपादक)
१. प्रतिवर्षी भाविक श्रीरामाची गाणी म्हणत सप्तशृंगी गडावर जातात. यामध्ये महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील भाविकांचाही समावेश असतो. त्याप्रमाणे यंदाही देवपूर येथे सकाळी शिरपूर नूरनगर येथून डीजे (ध्वनीयंत्रणा) आणि वाद्यावर श्रीरामाची गाणी वाजवत भाविक जात होते. या वेळी पोवाडेही वाजवले जात होते.

२. धर्मांधांनी अरेरावीची भाषा करून भाविकांना डीजे (मोठी ध्वनीक्षेपक यंत्रणा) बंद करण्यास भाग पाडले, तसेच मिरवणुकीतील ५-६ भाविकांना मारहाणही केली. या वेळी घायाळ झालेल्या भाविकांना भाजपचे कार्यकर्ते अनुपभैय्या अग्रवाल यांनी साहाय्य केले. अग्रवाल यांनी या घटनेचा निषेध केला.

३. या घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक रेड्डी यांनी घटनास्थळी येऊन पहाणी केली, तसेच भाविकांशी चर्चा करून पोलीस बंदोबस्त वाढवला; मात्र या वेळी भाविक आक्रमक झाले होते. त्यांनी धर्मांधांवर कठोर कारवाईची मागणी केली.

४. श्री. अनुप अग्रवाल आणि गोरक्षक श्री. संजय शर्मा यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी चर्चा केली, तसेच दगडफेक आणि मारहाण करणार्‍या धर्मांधांना अटक करण्याची मागणी केली.

धर्मांधांना झुकते माप देऊन पोलिसांची हिंदूंवर दंडेलशाही !

देवपूर येथे शिवजयंती आणि गणेशोत्सव या काळात चाळीसगाव मार्गाने मिरवणूक काढण्याची हिंदुत्वनिष्ठांनी अनुमती मागितल्यानंतर ‘त्या रस्त्यावर मशीद आहे’ म्हणून पोलीस नेहमीच हिंदूंना अनुमती नाकारतात; मात्र मुसलमान चाळीसगाव रस्त्यावरून मिरवणूक बिनधास्तपणे काढतात. या मार्गावरून मिरवणूक काढण्यासाठी पोलीस त्यांना अनुमती देतात. त्यामुळे पोलिसांच्या अशा हिंदुद्वेषामुळे हिंदूंमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘सर्वांना समान न्याय पोलिसांनी दिला पाहिजे’, अशी हिंदूंची मागणी आहे.

संपादकीय भूमिका

  • भारतभर रामनवमीला धर्मांधांकडून हिंदूंच्या मिरवणुकीवर आक्रमण केले जाते. हे लक्षात घेऊन संवेदनशील ठिकाणी पोलीस स्वतःहून हिंदूंना संरक्षण का देत नाहीत ? निष्क्रीय पोलीस प्रशासनामुळे धर्मांधांचा जमाव हिंदूंवर आक्रमण करू धजावतो !
  • हिंदूंनो, तुमच्या मिरवणुकांसाठी तुमचे भक्कम संरक्षककवच कधी निर्माण करणार ?