‘श्रीराम’ हा शब्द उच्चारताच भाव जागृत होतो, देहपान हरपते. ! या शब्दातील ‘श्री’ म्हणजे शक्ती, सौंदर्य, सद्गुण, वैभव इत्यादींचा समुच्चय ! असा हा श्यामवर्ण, कमलनेत्र, आनंददायी अन् वात्सल्यमूर्ती श्रीरामचंद्र म्हणजे अनेक भाविकांची श्रद्धाज्योत ! रामभक्तांनो, म्हणूनच आजच्या रामनवमीच्या पवित्र दिनी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ असा नामजप करून श्रीरामत्त्वाचा लाभ घ्या !