श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळून समाजाला आदर्श घालून दिला; म्हणूनच त्याला ‘मर्यादा-पुरुषोत्तम’ असे म्हटले जाते. श्रीरामाशी एकरूप होणे म्हणजे ‘अनेकातून एकात जाणे’, तसेच ‘अनेकातून एकाकडे आणि एकातून शून्याकडे’ अशी अध्यात्मात प्रगती असते. येथे शून्य म्हणजे पूर्णावतार श्रीकृष्ण होय. श्रीरामाने संपत्कालात कसे वागावे, हे शिकवले अन् स्वतःच्या वर्तनातून सर्वांसमोर आदर्श ठेवला ! अशा श्रीरामरायाच्या चरणी भावपूर्ण वंदन !