‘२९.१.२०२४ या दिवशी मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. इतरांचा विचार करणारे साधक
मी सकाळी बसने पनवेल येथे पोचलो. तेव्हा आश्रमातील साधक बसस्थानकात माझ्या आधी येऊन थांबले होते. मला कुठलीही अडचण न येता नियोजित वेळेत आश्रमात पोचता आले.
२. साधकांमध्ये नम्रता आणि भाव असणे
मी आश्रमात पोचल्यावर मला ‘पहिल्यांदाच आश्रमात आलो आहे’, असे वाटले नाही. आश्रमातील सर्व साधकांचे वागणे आणि बोलणे नम्र अन् भावपूर्ण आहे. साधकांमध्ये पुष्कळ जिव्हाळा आहे. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ।’ (संत तुकाराम महाराज) (स्वतःच्या बोलण्याप्रमाणे ज्याची कृतीही असते, त्याच्यासमोर नतमस्तक व्हावे.) ही उक्ती सनातनच्या आश्रमातील साधकांना शब्दशः लागू आहे.
३. आश्रम पहातांना आणि साधकांना भेटतांना मला चैतन्य जाणवत होते.
४. ‘प्रत्येक साधकामध्ये प.पू. गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) गुण आले आहेत’, असे मला जाणवले.’
– श्री. विवेक ढेरे, कोथरूड, पुणे. (२९.२.२०२४)
|