US Reaction Kejriwal Arrest : (म्हणे) ‘केजरीवाल यांच्या प्रकरणात पारदर्शक कायदेशीर प्रक्रिया व्हावी !’ – अमेरिका

केजरीवाल यांच्या अटकेनंतर अमेरिका बरळली

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

वॉशिंग्टन – देहलीतील मद्य घोटाळ्याच्या प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर अमेरिकेने ‘केजरीवाल यांच्या अटकेवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. या प्रकरणी निष्पक्ष आणि पारदर्शक कायदेशीर प्रक्रियेला प्रोत्साहन देतो’, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केले आहे. केजरीवाल प्रकरणी पत्रकारांना विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना त्यांनी हे विधान केले.

१. यापूर्वी केजरीवाल यांच्या अटकेच्या प्रकरणी जर्मन सरकारने भाष्य केले होते. त्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले होते. यासह देहलीतील जर्मनीचे राजदूत जॉर्ज अँझवीर यांना पाचारण करण्यात आले होते. ‘जर्मनीने भारताच्या अंतर्गत सूत्रांमध्ये हस्तक्षेप करू नये’, असे त्यांना सुनावण्यात आले होते.

२. यापूर्वी अमेरिकेने ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’विषयी (सीएएविषयी) विधान केले होते. ‘आम्ही या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहोत’, असे अमेरिकेने त्यावेळी म्हटले होते.

संपादकीय भूमिका

  • अमेरिकेमध्ये मागील ३ महिन्यांमध्ये तेथे वास्तव्य करणार्‍या भारतीय वंशाच्या ९ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्याच्या अन्वेषणांविषयी अमेरिकेने बोलावे !
  • अमेरिकेत वर्णद्वेषी आक्रमणांचे प्रकार वाढत आहेत. भारताच्या अंतर्गत सूत्रांमध्ये हस्तक्षेप करण्यात वेळ घालवण्याऐवजी अमेरिकेने तेथे वाढणारा वर्णद्वेष रोखण्यासाठी प्रयत्न करावेत !