‘पणजी (गोवा) शहरात ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे धुळीचे प्रदूषण होत आहे. या प्रदूषणातून दिलासा मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात २ जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) झाल्या आहेत. ‘स्मार्ट सिटी’च्या कामांतील नियोजनशून्यतेमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे याचिकेत म्हटले आहे. गोवा सरकार, ‘इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन’ आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले असून त्यांना योग्य आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे. या प्रकरणी २६ मार्च २०२४ या दिवशी सुनावणी होणार आहे.’ (२१.३.२०२४)