श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या प्रसंगी लावण्यात आलेले भगवे ध्वज काढण्याचे प्रशासनाचे आवाहन !

आचारसंहितेच्या नावाखाली इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथील प्रकार !

प्रतिकात्मक छायाचित्रं

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – अयोध्या येथील श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या प्रसंगी इचलकरंजी येथील जवळपास प्रत्येक हिंदूच्या घरावर प्रभु श्रीरामाचे चित्र असलेले भगवे ध्वज लावण्यात आले होते. आचारसंहिता घोषित झाल्यावर इचलकरंजी येथे नगरपालिकेचे कर्मचारी हिंदूंच्या घरी जाऊन ‘भगवे ध्वज उतरवा’, असे सांगत आहेत. ही गोष्ट काही हिंदुत्वनिष्ठांना समजल्यावर त्यांनी, ‘आमच्या घरावर लावलेले भगवे ध्वज हे आमचे ध्वर्मध्वज आहेत. त्याचा राजकारणाशी संबंध नाही. त्यामुळे आम्ही ते काढणार नाही’, असे बाणेदार उत्तर दिले. प्रत्यक्षात २२ जानेवारीला झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वत्र श्रीरामाचे चित्र असलेले ध्वज लावण्यात आले होते. हे ध्वज हिंदूंनी उत्स्फूर्तपणे लावले होते. या ध्वजाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसतांना निधर्मी शासन प्रणालीमुळे अधिकार्‍यांच्या आदेशानुसार कर्मचारी हिंदूंना घरोघरी जाऊन भगवे ध्वज काढण्यास सांगत आहेत.