पोरबंदर (गुजरात) येथे ४५० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त ‘

६ पाकिस्तानी नागरिकांना अटक

पोरबंदर (गुजरात) – येथील समुद्र किनारी भारतीय तटरक्षक दल, ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ आणि गुजरात आतंकवादविरोधी पथक यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत एका नौकेतून ४५० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणी ६ पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी २८ फेब्रुवारीला गुजरातच्या किनार्‍याजवळ संशयित पाकिस्तानी नौकेतून २ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

संपादकीय भूमिका 

गुजरातच्या किनार्‍यांवर आणि बंदरांवरच सर्वाधिक अमली पदार्थ सापडत आहेत. हे पहाता सरकारने अधिक सतर्कता वाढवणे आवश्यक आहे !