भारताची प्रगती थांबवण्यासाठी चीनकडून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची निवड !

‘भारतातील मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या आणि त्यांचे निकाल लागायला काही दिवस अवकाश होता. तेव्हा अचानकपणे एक दिवस ‘राहुल गांधी हे दक्षिणपूर्व आशियामधील व्हिएतनाम, इंडोनेशिया, सिंगापूर आणि मलेशिया या ४ राष्ट्रांना भेट देणार आहेत’, अशी घोषणा केली गेली. त्यांना चीनमधून अचानक दूरभाष आला होता. त्यामुळे ते ९.१२.२०२३ या दिवशी विदेश दौर्‍यावर निघणार होते. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी या ४ राष्ट्रांमध्ये का जाणार होते ? यामागे काही कारणे आहेत. सिंगापूर आणि मलेशियामध्ये ते तेथे स्थायिक झालेल्या भारतियांना भेटणार होते. इंडोनेशिया येथे ते राजकारण्यांची भेट घेणार होते, तसेच ते व्हिएतनाममधील साम्यवादी नेत्यांची भेट घेण्याची शक्यता होती, अशी माहिती त्यांच्या स्रोतांनी दिली होती. याविषयीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

(भाग १)

१. व्हिएतनाम, इंडोनेशिया, सिंगापूर आणि मलेशिया हे उद्योगपती अदानी यांच्यासाठी महत्त्वाचे देश !

चीनपुढे अशी कोणती समस्या उभी राहिली की, राहुल गांधी यांना या देशांमध्ये जाण्याची आवश्यकता भासली. ज्या ४ देशांमध्ये राहुल गांधी जाणार होते, ते उद्योगपती अदानी यांचे प्रिय देश आहेत. अदानींमुळे चीनपुढे समस्या निर्माण होत आहेत; कारण चीनने संपूर्ण भारताच्या सभोवती हिंदी महासागरात लष्करी तळांची शृंखला (मोत्यांचा हार) बनवली आहे. देशाच्या सभोवती मोत्यांचा हार सिद्ध करून, म्हणजे हिंदी महासागरात सैनिकी तळांची शृंखला निर्माण करून चीन भारताला घेरण्याचा प्रयत्न करत होता. त्याच धोरणाचा अवलंब करून त्याच्या ४ पावले पुढे जाऊन भारताने चीनभोवती ३ केंद्रीत वर्तुळाकार आकारात हिर्‍यांचा हार बनवण्यास प्रारंभ केला. त्याचा मुख्य भाग उद्योगपती गौतम अदानी आहेत. राहुल गांधी चीनला गेले होते आणि त्या ठिकाणी कोणती निवेदने दिली किंवा कोणता करार झाला, हे सर्वांना ठाऊक आहे. ज्या ४ देशांना राहुल गांधी यांनी भेट दिली, ते देश नकाशा उघडून पाहिल्यास आपल्या लक्षात येईल.

२. अदानींच्या दक्षिणपूर्व आशियातील विविध प्रकल्पांमुळे चीनपासून भारताचे रक्षण !

मलेशियाचा नकाशा पाहिल्यास तो सर्व भाग चीनचा आहे, म्हणजेच चीनचे घर आहे. या भागात भारत विविध प्रकल्प उभारून या भागाला स्वतःच्या संरक्षणासाठी सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे, ते चीनला सहन होत नाही. मी याला भारताची गुंतवणूक नव्हे, तर अदानींची गुंतवणूक म्हणेन. पहिल्यापासून पाहिल्यास जून २०२२ मध्ये अदानी यांनी व्हिएतनामच्या भागात १० अब्ज अमेरिकी डॉलर्स (८३ सहस्र कोटी रुपये) गुंतवणूक करण्याची घोषणा केल्याचे वृत्त ९.२.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झाले होते. त्याप्रमाणे त्याठिकाणी अधिकृत प्रशासकीय प्रक्रिया चालू झाली. हे स्थान मलाक्का सामुद्रधुनीच्या जवळपास आहे. मलाक्का हा पाण्याचा चिंचोळा भाग इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाजवळ आहे. हा चिंचोळा भाग भारताने नियंत्रणात घेतला, तर चीनकडे कोणताही मार्ग शिल्लक उरणार नाही. त्यासाठी चीनने अब्जावधी डॉलर्स गुंतवून त्यावर त्याचे प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न केला, तसेच पर्यायी मार्ग म्हणून आजच्या स्थितीत अफगाणिस्तानचा मार्ग शोधून काढला. मलाक्का सामुद्रीधुनीमध्ये भारताचे आधीपासूनच बंदर आहे. त्यामुळे चीन व्हिएतनाम, इंडोनेशिया, सिंगापूर आणि मलेशिया हे ४ देश त्याच्या  कह्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या ४ देशांमध्ये अदानींनी गुंतवणूक केली, तर चीनची अक्षरशः लंका होईल; कारण त्यांची ८० टक्के निर्यात युरोप, आफ्रिका आणि अमेरिका येथे होते अन् तेथे जाण्याचा मार्ग हाच आहे. हो… मध्यंतरीच्या काळात त्यांनी थायलंडमधून जाण्याचा प्रयत्न केला होता; परंतु या मार्गाने जाण्यास जहाजाला २५ किलोमीटर प्रवास करावा लागतो. या मार्गावरून जहाजाने जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात खणून काढावे लागेल. त्यांना विस्तार करावा लागेल; कारण मध्ये बेटे आहेत. तो पूर्ण भाग बेटे असलेला आहे.

३. काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात चीनकडून भारताला घेरण्याचा प्रयत्न !

झाकीर नाईक

आता दुसरा देश मलेशिया पाहूया. जेथे राहुल गांधी यांचे जाण्याचे नियोजन होते. मलेशियामध्ये त्यांचे दुसरे बंधू हिंदुद्वेष्टे डॉ. झाकीर नाईक बसले आहेत. झाकीर नाईक हे सर्वांना ठाऊक आहेत. त्यांना भारताविषयी किती प्रेम आहे ? हेही ठाऊक आहे. हे जेवढे प्रकल्प होऊ घातले आहेत, त्यामध्ये चीनला घेरले जाईल. हेच ‘डायमंड नेकलेस’ (हिर्‍यांचा हार)चे धोरण आहे. आपण आदर ठेवला, तर भारतीय तुम्हाला डोक्यावर बसवतील; परंतु डोळे वटारून पाहिल्यास तुम्हाला तिथल्या तेथे निपटून काढतील. तुम्ही मोत्यांची साखळी (सैनिकी तळांची शृंखला) बनवली. त्या वेळी मनमोहन सिंह यांचे सरकार होते. ते गप्प बसले; कारण ते स्वतःच चीनच्या बाजूने असल्याने चीनच्या हातातील बाहुले बनले होते, तसेच ते सोनिया गांधी यांच्या ताटाखालचे मांजर झाले होते.

४. सिंगापूरमध्ये अब्जावधी अमेरिकी डॉलर्सची भारतीय गुंतवणूक !

आपण सिंगापूरविषयी पाहूया. सिंगापूर हे अत्यंत मोक्याचे ठिकाण आहे. प्रसारमाध्यमांनी सांगितले की, अदानी समूहाची सिंगापूरमधील गुंतवणूकदारांशी बोलणी होत आहेत. त्यात ‘टेमासेक’ आणि सरकारी गुंतवणूक महामंडळ यांचा समावेश आहे. येत्या दशकामध्ये या गुंतवणुकीमध्ये १० अब्ज अमेरिकन डॉलर्सने वाढ होईल. यापैकी ७० अब्ज अमेरिकन डॉलर्स स्वच्छ ऊर्जा, बंदर आणि सिमेंट यांच्या व्यवसायासाठी वापरले जातील. येथे अमेरिकेशीही बोलणी झाली. त्यामुळे सिंगापूर हे दुसरे अत्यंत महत्त्वाचे आणि मोक्याचे ठिकाण आहे. हे मलाक्का सामुद्रीधुनीला जोडलेले आहे. सिंगापूर हा लहान; पण अत्यंत विकसित देश आहे आणि मलाक्का सामुद्रीधुनीमध्ये त्याचे असलेले अस्तित्व मोक्याचे अन् भौगोलिक राजकीय ठिकाणी आहे.

५. भारताची गुंतवणूक थांबवण्यासाठी चीनकडून राहुल गांधींची निवड !

राहुल गांधी व्हिएतनामला का गेले ? ते पाहूया. व्हिएतनाम देश थोडा दूर आहे. राहुल गांधी यांनी व्हिएतनाममध्ये चीनच्या साम्यवादी पक्षाचे पाठबळ असलेल्या व्हिएतनाम साम्यवादी पक्षाला भेटण्याचे नियोजन केले. व्हिएतनामच्या साम्यवादी पक्षाचे चीनच्या साम्यवादी पक्षाशी चांगले संबंध आहेत. याठिकाणी अदानी समूहाकडून उभारण्यात येणार्‍या प्रकल्पासाठी आरंभीची गुंतवणूक अंदाजे १ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या जवळपास आहे. गौतम अदानी समूह इंडोनेशियाच्या सरकारशी तेथील महत्त्वाचे असणारे सबांग बंदर विकसित करण्याविषयी बोलणी करत असल्याची माहिती मिळाली. चीनच्या आसपासच्या देशात जाण्यासाठी चीनने कुणाची निवड केली आहे ? तर राहुल गांधी यांची ! ‘चीनच्या घरात घुसण्यापासून अदानी यांना थांबवा !’, हे कारण होते.

या ४ देशांना चीन त्याचे घर समजतो. हे ४ देश, म्हणजे चीनचे मागील अंगण आहे आणि तेथे इतरांना येण्यापासून थांबवण्यासाठी चीन साम, दाम, दंड अन् भेद अशा प्रकारच्या सर्व नीतीचा अवलंब करण्यासाठी सिद्ध आहे. त्या वेळी संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरला चालू झाले होते. या अधिवेशनामध्ये जम्मू आणि काश्मीरविषयीचे अत्यंत महत्त्वाच्ो विधेयक चर्चेला येणार होते. त्याखेरीज अजून १७ ते १८ महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होणार होती आणि या विधेयकांचे रूपांतर कायद्यात होणार होते. असे असतांनाही राहुल गांधी या ४ देशांमध्ये निघाले होते. या देशांमध्ये त्यांना चीनसारखेच धोरण असणार्‍या लोकांना भेटायचे होते. तेथे त्यांना चिनी लोकांशी भेटणे पुष्कळ सोपे होते; परंतु एक गोष्ट अशी पहाण्यात आली की, जेव्हा ते विदेशात असतात किंवा विदेशातून परत येतात, तेव्हा भारतात गदारोळ माजलेला असतो. कदाचित् हा योगायोग असेल; परंतु राजकीय योगायोग पुनः पुन्हा होत नसतात.

६. चीनच्या प्रयत्नांनंतरही पुन्हा सर्व ठिकाणी अदानी समूह यशस्वी !

आलेल्या बातमीनुसार या सर्व ठिकाणी ‘बी.एस्.ई. ग्रेनर्स’, ‘अदानी ग्रीन एनर्जी’, ‘अदानी एनर्जी सोल्युशन्स’, ‘अदानी टोटल गॅस’, ‘अदानी पोर्ट्स अँड स्पेसी’, ‘अदानी एंटरप्राईजेस’ ही अदानींची सर्व आस्थापने यशस्वी ठरली आहेत. राहुल गांधी यांच्या जेवढ्या गुप्त बैठका होतात, त्याविषयी भारत सरकारला सर्वकाही ठाऊक असते. कदाचित् तेथेच ते त्यांचे धोरण निश्चित करत आहेत. या गोष्टी येथेच थांबणे आवश्यक आहे; कारण गांधी यांचे चीनशी मिळणे आणि त्यांच्याशी सहमत होणे, हे त्यांचे  प्रत्येक पाऊल भारतविरोधी आहे. व्हिएतनामला तेथील साम्यवादी पक्षाच्या नेत्यांना ते कोणत्या अधिकृत पदावरून भेटतात ? काँग्रेसचे राजकुमार, काँग्रेसचे सर्वेसर्वा कि भारताचे सर्वेसर्वा म्हणून ?

७. हिंदु संस्कृतीचा देश असलेल्या थायलंडची अपकीर्ती !

आता थायलंडविषयी पाहूया. थायलंडमध्ये ते राजकीय नेत्यांना भेटू शकत नाहीत. कोणत्या अधिकृत पदाने त्या लोकांना भेटणार आहेत, याचे उत्तर ते देऊ शकतात का ? कि तेथे १८ वर्षे वयाच्या मुलींसह फिरायला जाण्यासाठी जात आहेत ? मला तुम्हाला सांगायचे आहे की, थायलंडमध्ये ९० टक्के गोष्टींना आपल्याच हिंदूंची नावे आहेत. ज्याप्रमाणे ईशान्येकडे गेल्यावर काही गोष्टींमध्ये पालट झाले, तसे तेथे जाऊन थोडी आणखी नावे पालटली गेली. मुलींकडून मसाज करून घेण्याच्या नावाखाली थायलंड आणि बँकॉक या देशांची लोकांनी अपकीर्ती केली आहे; परंतु आपण तेथे गेलो, तर आपल्याला तसे वाटणारही नाही.

आपल्याकडील अयोध्येप्रमाणे तेथेही एक अयोध्या आहे, तिला ते ‘अयुथ्या’ असे म्हणतात. ते लोक ‘ध’ न म्हणता ‘थ’ म्हणतात. स्वर्णभूमी विमानतळावरील ९९ टक्के नावे हिंदी आहेत; केवळ त्या शब्दांमध्ये थोडसे पालट झाले आहेत. उदा. त्यांनी ‘परब्रह्म’हा शब्द ‘परमो ब्रह्म’ असा लिहिला आहे.

(क्रमश:)

– गायत्री देवी

(साभार : ‘द अल्टरनेट मिडिया’ यू ट्यूब चॅनेल)

संपादकीय भूमिका 

काँग्रेसची चीनशी वाढती घनिष्ठ मैत्री राष्ट्रघातकी असून त्यावर सरकारने कठोर कारवाई करावी, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/772932.html