म्हापसा : म्हापसा बाजारातील ३ ठिकाणी जलवाहिन्या फुटल्याने आणि पाण्याचा निचरा होण्यासाठीची गटारेही कचर्यामुळे तुंबल्याने येथील परिसर जलमय झाला होता. ९ मार्चला सकाळी हा प्रकार घडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर जलवाहिन्या सायंकाळपर्यंत दुरुस्त करण्यात आल्या. ‘अशा परिस्थितीत अचानक पाऊस पडल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे गटारांची स्वच्छता करण्यात यावी’, अशी मागणी म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत यांनी केली.