भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला केले सतर्क !
इस्लामाबाद (पाकिस्तान) : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला दिलेल्या कजाविषयी भारताने कठोर भूमिका घेतली आहे. भारताने नाणेनिधीला पाकिस्तानला दिलेल्या कोणत्याही कर्जावर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. नाणेनिधीकडून मिळालेला पैसा सैन्यासाठी किंवा इतर देशांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरला जाऊ नये, याकडे नाणेनिधीनी लक्ष देण्याची मागणी भारताने केली आहे. गेल्या गेल्या वर्षी जुलैमध्ये पाकिस्तानला नाणेनिधीने दिलेल्या कर्जाच्या पुनरावलोकच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळासमोर भारताचे प्रतिनिधी कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम् यांनी भारताची भूमिका मांडली होती.
#India alerts the International Monetary Fund – the #IMF!
Ensure Pakistan does not utilize loans taken from IMF to foot defence bills !
Why does India have to caution the IMF? Doesn't the IMF understand this?@mayankjain100 pic.twitter.com/KIboPWF0FC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 8, 2024
संपादकीय भूमिकाहे भारताला का सांगावे लागते ? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला कळत का नाही ? |