देवाची ओढ असलेला ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला उडपी, कर्नाटक येथील कु. रामनाथ नायक (वय १० वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. रामनाथ नायक हा या पिढीतील एक आहे ! 

कु. रामनाथ नायक

१. जन्मापूर्वी

‘माझी मुलगी (सौ. श्रद्धा नायक) गरोदर आहे’, असे समजल्यावर मी तिला सनातनचे ‘गर्भधारणेची सिद्धता आणि गर्भवतीने घ्यायची काळजी’, ‘प्रसुतीनंतर आई आणि बाळ यांची घ्यायची काळजी’ आणि ‘बाळाची वाढ आणि विकास (लसीकरणाच्या विवेचनासह)’ हे ग्रंथ वाचायला दिले. ती श्रीरामरक्षा ऐकत असे आणि श्रीविष्णुसहस्रनाम म्हणत असे. ती शुक्रवार आणि शनिवार या दिवशी मंदिरात जात असे. तिचा ‘स्वतःच्या पोटी श्रीकृष्ण जन्माला येणार’, असा भाव असे. तिला प्रसुतीच्या वेळी पुष्कळ त्रास झाला. तेव्हा मी नामजप करणे आणि तिला नामजप करायला लावणे, असे प्रयत्न केले.

सौ. सीमा पै

२. जन्मानंतर

२ अ. वय ३ मास ते ३ वर्षे

२ अ १. देवाची आवड

अ. कु. रामनाथ ३ मासांचा असतांना मी भजने म्हटल्यावर तो एकाग्रतेने ऐकत असे. त्याला श्रीकृष्णाचे चित्र दाखवल्यावर तो त्या चित्रावर स्वत:चा चेहरा ठेवत असे.

आ. तो दीड वर्षाचा असतांना त्याला कुडाळ सेवाकेंद्रात नेल्यावर तो परम पूज्यांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) छायाचित्राकडे एकटक बघत राहिला.

२ आ. वय ३ ते १० वर्षे

२ आ १. गुरुंप्रती भाव : रामनाथ तिसर्‍या इयत्तेत शिकत असतांना त्याच्या शाळेत (श्री श्री रविशंकर महाविद्यालय, कार्काळा, उडुपी) गुरुपूजनाचा कार्यक्रम होता. गुरुपूजन चालू असतांना रामनाथची भावजागृती होऊन त्याच्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. कार्यक्रम संपल्यावर त्याविषयी रामनाथने शाळेच्या संचालकांना सांगितले. तेव्हा संचालक रामनाथच्या आईला (सौ. श्रद्धाला) म्हणाले, ‘‘रामनाथला सत्संगात पाठवा. तो सात्त्विक आहे.’’

२ आ २. स्तोत्रे म्हणण्याची आणि भजने ऐकण्याची आवड : त्याने शाळेत शिकवलेले भगवद्गीतेचे अध्याय आणि हनुमानचालीसा मुखोद्गत केली. तो शाळेतून घरी आल्यावर शाळेत शिकवलेले स्तोत्र सर्वांना म्हणून दाखवत असे. तो त्याच्या आजोबांच्या (श्री. कमलाक्ष नायक यांच्या) समवेत भजने ऐकण्यासाठी जात असे. त्याच्या शाळेतील शिक्षिका स्तोत्र शिकवत असतांना त्यांनी काही अयोग्य म्हटले, तर रामनाथ शिक्षिकेला त्याविषयी सांगत असे.

२ आ ३. धर्माचरण करणे : एकदा मी उडुपी येथे मुलीकडे गेल्यावर ‘श्रीरामरक्षा म्हणून वाढदिवस कसा साजरा करायचा ?’, याविषयी सांगितले. तेव्हा रामनाथने त्याचा वाढदिवस शास्त्रानुसार करायला सांगितला. रामनाथचे चुलत भाऊ-बहीण यांचा वाढदिवस असतांना तो त्यांच्याकडे गेल्यावर त्यांना ‘वाढदिवस कसा साजरा करावा ?’, याविषयी सांगतो. त्यांनी तसे केले नाही, तर रामनाथ त्यांना स्वतःच्या घरी बोलावून ‘श्रीरामरक्षा म्हणून आणि औक्षण करून वाढदिवस कसा साजरा करायचा ?’, याचे प्रात्यक्षिक करून दाखवतो.

२ आ ४. मांसाहार घेणे बंद करणे : रामनाथच्या घरातील व्यक्ती मांसाहार करतात. पूर्वी रामनाथलाही मांसाहार करायला पुष्कळ आवडत असे. मी त्याला मांसाहार न करण्याविषयी सांगितल्यापासून त्याने मांसाहार घेणे बंद केले.

२ आ ५. नामजपाची आवड असणे : त्याला मराठी भाषा येत नाही. त्याला मराठीत नामजप लिहायला शिकवल्यावर तो मराठीत सुंदर अक्षरांत नामजप लिहितो. त्याच्या आजीचे (वडिलांच्या आईचे) शस्त्रकर्म झाल्यावर त्याने आजीला नामजप करायला सांगितला आणि त्यांना ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’ ‘डाऊनलोड’ करून दिले.

२ आ ६. त्यांची कुलदेवता फोंडा, गोवा येथील रामनाथ देव आहे. तो वर्षातून एकदा तिकडे जातो. तो मला सांगतो, ‘‘मी दुरून रामनाथी आश्रम बघून आलो.’’

२ आ ७. सेवा करायला आवडणे : तो वर्ष २०२३ च्या मे मासात कुडाळ सेवाकेंद्रात आला होता. तेव्हा तिथे बालसाधिका सेवा करत होती. ते पाहून तो उडुपीला गेल्यावर सेवा करायला लागला. त्याने मला आकाशकंदिलाच्या सेवेत साहाय्य केले.

२ आ ८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव : एकदा मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. मी रामनाथला याविषयी सांगितल्यावर त्याने सांगितले, ‘‘मला प.पू. गुरुदेवांना त्यांना भेटायचे आहे.’’ तेव्हा मी त्याला म्हणाले, ‘‘तू प्रतिदिन नामजप लिही. तुला गुरुदेवांचे दर्शन होईल.’’ तेव्हापासून तो शाळेतील सुटीच्या वेळेत वहीत एक पान नामजप लिहितो.

३. रामनाथला आलेल्या अनुभूती

३ अ. रुग्णाईत असतांना रुग्णालयात परम पूज्य, दत्तगुरु आणि श्रीकृष्ण यांचे अस्तित्व जाणवणे : एकदा तो घरी धक्का लागून जोरात पडला. त्याच्या डोक्याला मार लागून त्याला आकडी येत होती. आम्ही त्याला रुग्णालयात नेले. तेव्हा मी त्याला परम पूज्यांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) छायाचित्र दिले. त्याने ते छातीजवळ घट्ट पकडून ठेवले. त्याच्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. त्याला सद्गुरु सत्यवान कदम यांनी सांगितलेला नामजप करायला सांगितल्यावर तो प्रयत्नपूर्वक नामजप करत होता. त्याला अतीदक्षता विभागात ठेवले होते. मी त्याला भेटायला गेले. त्या वेळी त्याला ग्लानी होती. मी त्याला सांगितले, ‘‘परम पूज्य, दत्तगुरु आणि श्रीकृष्ण तुझ्या शेजारी उभे आहेत. तू डोळे बंद कर आणि शांत झोप. तुला ते दिसतील.’’

तेव्हा त्याने डोळे बंद केले. दुसर्‍या दिवशी सकाळी त्याची आई ६ वाजता त्याला पहायला गेल्यावर तो आईला म्हणाला, ‘‘बघ. माझ्या बाजूला कोण आहेत ? परम पूज्य, दत्तात्रेय आणि श्रीकृष्ण.’’ तेव्हा त्याची आई रडू लागली. तो आईला म्हणाला, ‘‘तू रडू नकोस.’’ तो रुग्णालयात नामजप लिहिण्याचा प्रयत्न करत होता.’

३ आ. तो शाळेतून आल्यावर एक घंटा ‘कार्टून’ बघत असे. एकदा तो मला म्हणाला, ‘‘मी नामजप लिहिल्यावर मला पांढरा प्रकाश दिसतो. मी दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पाहिल्यावर मला काळे दिसते.’’

४. जाणवलेला पालट : पूर्वी रामनाथचा स्वभाव पुष्कळ चिडचिडा होता. आता तो पुष्कळ शांत झाला आहे.’

– सौ. सीमा पै (कु. रामनाथची आजी, रामनाथच्या आईची आई), कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (५.९.२०२३)