१.१२.२०२३ ते ३.१२.२०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आयोजित केलेल्या ‘मराठी साधना शिबिर २०२३’ या शिबिरात सहभागी झालेल्या एका जिज्ञासूला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ‘मी भूवैकुंठामध्ये आले असून माझ्या आजूबाजूला असलेले सर्व साधक हे देवीदेवता आहेत’, असे मला जाणवले.
२. ध्यानात ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, सर्व साधक दिसणे आणि ‘भूवैकुंठातील क्षीरसागरामध्ये एका नौकेमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले बसलेले दिसून ते सर्वांना दिशादर्शन करत आहेत’, असे दिसणे : पहिल्या दिवशी सभागृहामध्ये प्रवेश केल्यावर दोन मिनिटांतच माझा नामजप चालू होऊन माझे ध्यान लागले. ध्यानामध्ये मला असे दिसले की, ‘मी समुद्रामध्ये नौकेतून जात आहे. हे सभागृह त्या नौकेमध्ये आहे. त्यामध्ये सर्व साधक बसलेले आहेत. नौकेच्या आरंभी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले उभे आहेत. ते पुढे हात दाखवत आहेत आणि नौका पुढे नेत आहेत. त्या वेळी ‘ती नौका भूवैकुंठातील क्षीरसागरातून जात आहे’, असे मला जाणवले.
३. तिसर्या दिवशीसुद्धा मी सभागृहात बसल्यावर ‘आपल्या सभागृहाच्या आजूबाजूला पाणी म्हणजेच क्षीरसागर आहे’, असे मला जाणवले.
या अनुभूती दिल्याबद्दल गुरुचरणी कृतज्ञता !’
– डॉ. (सौ.) राजश्री घाडगे, कल्याण, ठाणे. (१९.१२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |