Muslim Cleric Faces Fatwa : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या मुसलमान नेत्याला जिवे मारण्याच्या धमक्या आणि फतवा !

माझ्यावर आक्षेप घेणार्‍यांनी पाकिस्तानात चालते व्हावे ! – डॉ. इमाम उमेर अहमद इलियासी

डॉ. इमाम उमेर अहमद इलियासी

नवी देहली – अयोध्येत २२ जानेवारी या दिवशी झालेल्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे प्रमुख डॉ. इमाम उमेर अहमद इलियासी हेही उपस्थित होते. यावरून धर्मांध मुसलमानांचे पित्त खवळले. त्यावरून त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या, तसेच त्यांच्या विरोधात फतवाही काढण्यात आला.

यावर डॉ. इमाम उमेर अहमद इलियासी म्हणाले,

१. मी हे सांगू इच्छितो की, हा इस्लामी देश नाही. हा भारत आहे. येथे विविधतेत एकता आहे. जर या लोकांना ‘मी कृतीतून दिलेल्या प्रेमाच्या संदेशावरून काही त्रास असेल’, ‘मी राष्ट्राच्या बाजूने उभा आहे’, ही माझी चूक वाटत असेल, तर त्यांनी खुशाल पाकिस्तानात जावे. मी कुठलाही अपराध केलेला नाही. मी कोणताही फतवा मानत नाही. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. मी झुकणार नाही.

२. माझ्या विरोधात तिरस्काराचे वातावरण निर्माण केले जात आहे. मी आणि माझे कुटुंबीय यांच्या विरोधात अपशब्द वापरले जात आहेत. हुसैनी कास्मी नावाच्या एकाने माझ्या विरोधात फतवा जारी केला आहे. त्यातून त्यांनी माझा भ्रमणभाष क्रमांक संपूर्ण देशातील लोकांना दिला आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘मी क्षमा मागावी आणि त्यागपत्र द्यावे किंवा परिणामांना तयार रहावे.’

३. मला श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण आल्यावर मी २ दिवस त्याविषयी विचार केला आणि ठरवले की, मी या सोहळ्याला गेले पाहिजे. असे केल्याने देशहिताच्या दृष्टीने सौहार्दाचे वातावरण निर्माण होईल. मला ठाऊक होते की, मला विरोध केला जाईल.

४. मी मुख्य इमाम असल्याने मी या सोहळ्याला उपस्थित राहिलो. मी अयोध्येला गेलो, तेव्हा माझे स्वागत झाले. साधू संतांनीही मला आदर दिला. मी तेथे प्रेमाचाच संदेश दिला. मी म्हटले होते, ‘आपल्या जाती, पंथ, धर्म, पूजा करण्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतात; पण सर्वांत मोठा धर्म माणुसकीचा आहे. भारतात रहाणारे सगळे भारतीय आहेत.’

५. आपण सर्वांनी आपला भारत सशक्त केला पाहिजे. आमच्यासाठी ‘राष्ट्र सर्वोपरि’ आहे. आजचा संदेश द्वेष संपवण्याचा आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंना नेहमीच ‘धर्मांध’ ठरवून त्यांच्या विरोधात गरळओक करणारे धर्मनिरपेक्षतावादी, पुरो(अधो)गामी, समाजवादी आणि साम्यवादी इलियासी यांच्यासारख्या नेत्यांना त्यांच्याच धर्मबांधवांनी धमक्या दिल्यावर एक शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !