|
भाग्यनगर (तेलंगाणा) – राज्यातील करीमनगर जिल्ह्यात झालेल्या एका घटनेत एका गर्भवती गायीची चोरी करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. तिला गावाबाहेर नेऊन मारण्यात आले. तिचे पाय तोडण्यात आले आणि कातडी काढण्यात आली. या प्रकरणी सद्दाम, शेख ताज आणि मनोज मोरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी गायीचे मांस विकल्याचाही आरोप आहे. ही घटना समोर आल्यानंतर गावातील लोक संतप्त झाले. ‘तेलंगाणा गोहत्या निषेध आणि पशू संरक्षण अधिनियम १९७७’च्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही घटना ३१ डिसेंबरच्या रात्री करीमनगर जिल्ह्यातील शंकरपट्टणम् भागातील मोलंगुर गावात घडली. गजुला कुमार नावाच्या गावकर्याच्या गायीला सद्दाम, शेख ताज आणि मनोज मोरे यांनी चोरले. ही घटना समोर आल्यानंतर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी करीमनगर आणि वारंगल यांना जोडणार्या राष्ट्रीय महामार्ग ५६३ पर विरोध प्रदर्शन केले.
अशा प्रकारचे कृत्य करण्यास कुणी धजावणार नाही, अशी कारवाई करा ! – भाजप खासदार बंडी संजय कुमार
या घटनेसंदर्भात भाजपचे खासदार बंडी संजय कुमार यांनी ‘एक्स’वरून निषेध व्यक्त केला. गोहत्या झालेल्या घटनेचा व्हिडिओ प्रसारित करत ते म्हणाले की, हे पाहून माझे रक्त खवळले आहे. हे कृत्य भयावह आणि हृदयविदारक आहे. तेलंगाणाचे मुख्यमंत्री कार्यालय, पोलीस महानिरीक्षक आणि करीमनगर पोलीस आयुक्त यांच्याकडे मी मागणी करतो की, त्यांनी दोषींच्या विरोधात अशी कठोर कारवाई करावी, जेणेकरून अशा प्रकारचे कृत्य करण्यास कुणी धजावणार नाही !
संपादकीय भूमिका
|