कळंगुट, ३० डिसेंबर (वार्ता.) : ३० डिसेंबर या दिवशी पहाटे ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी हणजूण येथील ‘लियोनी’ या क्लबच्या व्यवस्थापनाकडे स्थानिक अॅश्ली फर्नांडिस याने विचारणा केली असता त्याला संबंधित क्लबच्या मालकाने लोखंडी सळीने मारहाण केली. हणजूण पोलिसांनी या प्रकरणी रितसर तक्रार नोंदवून घेऊन क्लबचा व्यवस्थापक विजय याला कह्यात घेतले आहे. सध्या ‘लियोनी’ क्लबचा मालक पसार आहे.
(सौजन्य : Dainik Gomantak TV)
या भागात लियोनी क्लबमध्ये पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास कर्णकर्कश संगीत वाजत असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक अॅश्ली फर्नांडिस आणि त्याच्या अन्य एका मित्राने तेथील व्यवस्थापक विजय याला जाब विचारला आणि कर्णकर्कश संगीत तात्काळ बंद करण्याची ताकीद दिली, अन्यथा पोलीस तक्रार नोंदवणार असल्याची चेतावणी दिली. यानंतर अॅश्ली फर्नांडिस याला मारहाण करण्यात आली.