‘सहजयोग ध्यान केंद्रा’कडून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे प्रकरण
जळगाव – सुजान मंगल कार्यालय, अमळनेर येथे ‘सहजयोग ध्यान केंद्रा’च्या माध्यमातून नाताळनिमित्त एक कार्यक्रम पार पडला. त्यात हिंदु धर्माचे आराध्यदैवत असणार्या श्री गणेशाला सांताक्लॉजचे कपडे घालून विकृत रूपात दाखवण्यात आले, तसेच दुसर्या एका भित्तीपत्रकात (‘पोस्टर’मध्ये) ‘ईसामसीह श्रीकृष्ण के पुत्र थे । वे मानव के चारित्रिक आधार है ।’, असे वाक्य लिहिलेले होते. कार्यक्रमस्थळी श्रीगणेशाला लहान, तर येशूला मोठे दाखवण्यात आले होते.
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
विहिंपकडून पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट !
या घटनेमुळे समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याने विश्व हिंदु परिषदेचे अमळनेर शहराध्यक्ष डॉ. संजय शाह यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात आयोजक भिकेश नवनीथलाल सराफ (पारोळा), भिका माळी (पाचोरा), दिनेश कुमावत (जळगाव) यांच्यासह अन्य ४ ते ५ जणांविरुद्ध तक्रार प्रविष्ट केली आहे. (हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्यांविरुद्ध तत्परतेने कृती करणारे डॉ. संजय शाह यांचे अभिनंदन ! – संपादक) या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे श्री. निखील जगदाळे, श्री. हितेश शाह, श्री. मुकेश परदेशी आदी उपस्थित होते.
संपादकीय भूमिका‘सहजयोग ध्यान केंद्रा’च्या नावाखाली हिंदूंचे ख्रिस्तीकरण करण्याचे हे छुपे षड्यंत्र तर नाही ना ? याचा हिंदूंनी शोध घ्यायला हवा. असे कार्यक्रम आयोजित करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या आयोजकांविरुद्ध कठोर कारवाई व्हायला हवी ! |