तक्रारीनंतर पोलिसांकडून अन्वेषण चालू !
कर्णावती (गुजरात) – सामाजिक माध्यमांवर सक्रीय असणार्या येथील एका ३० वर्षीय महिलेचे छायाचित्र अंतर्वस्त्रांच्या विज्ञापनासाठी परस्पर वापरण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या महिलेने हे विज्ञापन पाहिल्यानंतर पोलिसांत तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी याचे अन्वेषण चालू केले आहे. ही महिला एका निवृत्त पोलीस अधिकार्याची मुलगी आहे.
पीडित महिला सामाजिक माध्यमांवर सक्रीय आहे. ती इंस्टाग्रामवर सक्रीय आहे. तिने तक्रारीत म्हटले आहे की, २३ नोव्हेंबर या दिवशी ‘तृप्ती चौहान’ नावाच्या एका इंस्टाग्राम खात्यावरून संदेश मिळाला. यात या महिलेला तिचे अंतर्वस्त्रातील छायाचित्र असलेले विज्ञापन पाठवण्यात आले होते. या खात्यावर अन्य अनेक महिलांची अशा प्रकारची छायाचित्रे मिळाली. त्यांतील काही अश्लील होती. यासाठी महिलांच्या केवळ चेहर्यांचा वापर करण्यात आला होता.
संपादकीय भूमिकासामाजिक माध्यमांतून स्वतःचे किंवा मित्र, नातेवाईक आदींचे छायाचित्र ठेवणे धोक्याचे झाले आहे. छायाचित्रांचा वापर गुन्हेगारी कारवायांसाठी, तसेच फसवणुकीसाठी केला जात असल्याने लोकांनी छायाचित्र ठेवू नयेत, असे आता सरकारनेच सांगणे आवश्यक आहे ! |