वाणीचे वैखरी , मध्यमा, पश्यंती अन् परा असे चार प्रकार आहेत. संगीत म्हणजे नादोपासना आहे. कलाकाराच्या साधनेच्या स्थितीनुसार त्याच्या गायनाचा स्तर देखील या चार वाणीनुसार विभाजीत होतो. कलाकाराची साधना जसजशी वाढत जाते तसतसा त्याचा संगीताच्या वाणीचा स्तरही पुढच्या टप्प्यात जातो. जसे साधना न करणारा कलाकार, साधक कलाकार अन् संत कलाकार असा पुढे त्याचा प्रवास होतो; कारण कलेतून ईश्वराशी एकरूप होणे हाच कलेचा उद्देश आहे.
कलाकाराच्या आध्यात्मिक स्तरानुसार त्याचा संगीताच्या वाणीचा प्रकार, संगीत उत्पन्न होण्याचे शरिरातील स्थान, त्याची असलेली आध्यात्मिक पातळी, कलाकाराच्या साधनेची स्थिती इत्यादी भागांचे तात्त्विक विवेचन खालील कोष्टकात दिले आहे. या तक्त्याच्या माध्यमातून संगीतातून साधना करणार्या साधकाला पुढील दिशा मिळेल.
गाण्याचे स्तर
टीप : या ठिकाणी नमूद केलेल्या अनाहत आणि मणिपूर या चक्रांतून नाद उत्पन्न होत नसून ती केवळ उत्पन्न होणार्या नादाचे उत्पत्तीस्थान दर्शक आहेत. – संकलक : परात्पर गुरु डॉ. आठवले (३०.६.२०२३)
संग्राहक : सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (६.६.२०२३)