श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीचा सातवा दिवस
सांगली, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – श्री दुर्गामातेच्या चरणी आपण जे येतो ते व्यक्तीगत उत्कर्षासाठी काही मागणे मागण्यासाठी नाही, तर भारतमातेचा उद्ध्वस्त झालेला संसार दुरुस्त करण्याची शक्ती या देशाला द्यावी, यासाठी माझे आयुष्य पणाला लावून काम करण्याची इच्छा आहे. त्यासाठी देवीने आपल्याला दिशा द्यावी-शक्ती द्यावी, असे मागणे मागण्यासाठी आपण श्री दुर्गादेवीकडे येतो. देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला देवीचे भक्त व्हावे लागेल, तसेच ती आर्तता आपल्यात निर्माण करावी लागेल. यानंतर ती भगवती निश्चित आपल्याला, तसा आशीर्वाद देईल, असे प्रतिपादन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते श्री दुर्गामाता दौडीच्या सातव्या दिवशी माधवनगर रस्त्यावरील श्री दुर्गामाता मंदिरासमोर धारकर्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.