घरवापसी करून विशालशी विवाह केल्यावर खुशबूने जीविताला धोका असल्याचे सांगितले !

  • कुटुंबीय आणि नातेवाईक नवदांपत्यावर आक्रमण करू शकतात, अशी वर्तवली भीती !

  • इस्लामी आक्रमकांच्या अत्याचारांना कंटाळून मुसलमान बनले पूर्वज ! – खुशबू

खुशबू बानो

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील खुशबू बानो नावाच्या एका मुसलमान महिलेने घरवापसी करून हिंदु धर्म स्वीकारला आहे. तिला आता केवळ खुशबू या नावाने ओळखले जाईल. तिने विशाल नावाच्या युवकाशी ११ सप्टेंबरला अगत्स्य मुनि आश्रमात वैदिक मंत्रोच्चारांत विवाह केला. २४ वर्षीय खुशबूचे म्हणणे आहे की, तिचे पूर्वज इस्लामी आक्रमकांच्या अत्याचारांना कंटाळून मुसलमान बनले होते. नवदांपत्याने ६ ऑक्टोबर या दिवशी त्यांच्या जीविताला धोका असल्याचे सांगत पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली.

खुशबूने जिल्हाधिकार्‍यांना लिहिलेल्या प्रार्थनापत्रात म्हटले की, मी माझ्या कुटुंबियांच्या विरोधात जाऊन विशालशी विवाह केला आहे. माझे कुटुंबीय आणि नातेवाईक आम्हा दोघांची हत्या करू शकतात. मुसलमान धर्मात महिलांचा आदर केला जात नाही. त्यामुळेच मी वैदिक हिंदु धर्म स्वीकारला आहे.

‘हिन्दू शेर सेने’चा पुढकार !

खुशबू आणि विशाल यांचे गेल्या ४ वर्षांपासून प्रेम होते. खुशबूच्या कुटुंबियांचा त्यांच्या विवाहाला विरोध असल्याने विशालने ‘हिन्दू शेर सेना’ नावाच्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेशी संपर्क साधला. सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास हिन्दू यांनी अगत्स्य मुनि आश्रमाशी त्यांना जोडून दिले आणि ११ सप्टेंबरला दोघांचा विवाह संपन्न झाला. यासह विकास हिन्दू यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहून दोघांच्या संरक्षण देण्याचीही मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

  • लव्ह जिहादला एकतर थोतांड म्हणणारे अथवा ‘प्रेमाला धर्माच्या चष्म्यातून पाहू नका’, असा हिदुत्वनिष्ठांना उपदेशाचा डोस पाजणारे आता खुशबूच्या कुटुंबियांच्या विरोधात गप्प का ?