कोल्हापूर – ‘जलजीवन नळ पाणीपुरवठा’ कामाचे १२ लाख रुपयांचे देयक संमत केले म्हणून ३ टक्के दलालीपोटी ३३ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी करणार्या चंदगड तालुक्यातील महिला उपअभियंत्या सुभद्रा कांबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.
सुभद्रा कांबळे यांनी घुल्लेवाडीमध्ये जलजीवन नळ पाणीपुरवठा कामाचे देयक संमत केले; म्हणून तक्रारदाराकडे संमत केलेल्या १२ लाख रुपयांच्या देयकांमधील ३ टक्के वाटा म्हणून ३३ सहस्र रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती २५ सहस्र रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदाराकडून सुभद्रा यांना लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सुभद्रा कांबळे यांच्यावर चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (प्रशासकीय पातळीवर अनेक वेळा अशा प्रकारची अटक होते; मात्र पुढे कठोर कारवाई होत नसल्याने हे प्रकार थांबत नाहीत. त्यासाठी लाच मागणार्यांच्या विरोधात कठोर कारवाईची तरतूद हवी ! – संपादक)