खासगी मुसलमान संस्‍थेला दिलेली हलाल प्रमाणपत्र देण्‍याची अनुमती रहित करावी !

हुपरी (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलना’द्वारे सरकारकडे मागणी !

हुपरी (जिल्‍हा कोल्‍हापूर), १९ सप्‍टेंबर (वार्ता.) – केंद्र सरकारने ६ मासांसाठी ‘जमियत उलेमा ए हिंद’ या संघटनेला ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्‍याची जी अनुमती दिली आहे, ती रहित करण्‍यात यावी. ‘सनातन धर्मा’ला नष्‍ट करण्‍याची आक्षेपार्ह आणि द्वेषमूलक भाषा करणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅलिन, द्रमुकचे खासदार ए. राजा अन् त्‍याचे समर्थन करणारे कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे यांना तात्‍काळ अटक करण्‍यात यावी, अशी मागणी ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलना’त करण्‍यात आली. हे आंदोलन १८ सप्‍टेंबरला येथील नेताजी सुभाषचंद्र चौक येथे करण्‍यात आले. आंदोलनानंतर विविध मागण्‍यांचे निवेदन हुपरी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी क्षितीज देसाई यांना देण्‍यात आले.

या प्रसंगी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे श्री. संदीप पवार, उद्धव ठाकरे गटाचे विभागप्रमुख श्री. विनायक विभूते, ‘मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स’चे उपाध्‍यक्ष श्री. मोहन वाईंगडे, ‘नरवीर शिवा काशीद प्रतिष्‍ठान’चे नीळकंठ माने, ‘चांदी असोसिएशन’चे उपाध्‍यक्ष श्री. दीनकरराव ससे, मराठा समाजाचे अध्‍यक्ष श्री. रवि चिटणीस, धर्मप्रेमी श्री. नितीन काकडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. महेश इंग्रोळे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले.

या वेळी ‘दुर्गवेध प्रतिष्‍ठान’चे श्री. प्रवीण पाटील, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे श्री. महादेव आढावकर आणि श्री. सचिन माळी, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे श्री. उमैश दैने, बजरंग दलाचे श्री. प्रशांत साळुंखे, मराठा समाजाचे खजिनदार श्री. अजित उगळे, उपाध्‍यक्ष श्री. संजय निकम, मनसेचे श्री. ऋषिकेश साळी, ‘पैसाफंड बँके’चे श्री. शिवराज नाईक, श्री. घनशाम गायकवाड, माजी नगरसेवक श्री. दौलत पाटील, धर्मप्रेमी श्री. पवन कोळेकर आणि श्री. प्रकाश लोखंडे उपस्‍थित होते.