कु. शार्दुल चव्‍हाण (वय २१ वर्षे) यांना दैवी बालकांच्‍या सत्‍संगातील दैवी बालकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

‘मला दैवी बालकांच्‍या सत्‍संगात बसायला मिळाले. तेव्‍हा मला बालसाधकांकडून पुढील गुण शिकता आले.

कु. शार्दुल चव्‍हाण

१. सहजता : दैवी बालकांमध्‍ये सहजता दिसून येते. ते स्‍वतःच्‍या चुका, तसेच सहसाधकांच्‍या चुका सहजतेने सांगतात. त्‍यामुळे त्‍यांनी मला काही चुका सांगितल्‍या, तर त्‍या सहजतेने स्‍वीकारता येतात, तसेच मनात संघर्षही होत नाही. ते त्‍यांच्‍या अनुभूतीही सहजतेने मांडतात.

२. दैवी बालकांमध्‍ये तत्त्वनिष्‍ठता आहे.

३. नियोजन कौशल्‍य : ६ वर्षांपासून ते १८ वर्षांपर्यंतची मुले बालसत्‍संगात येतात. दैवी बालके लहान असूनही त्‍यांच्‍यात नियोजन कौशल्‍य आहे. ते सत्‍संगाचे नियोजन छान करतात आणि जरी त्‍यात काही पालट झाला, तरीही नवीन नियोजन तत्‍परतेने स्‍वीकारतात.

४. दैवी बालके दायित्‍व घेवून सेवा करतात.

५. दैवी बालके प्रत्‍येक कृती विचारून करतात.

६. ईश्‍वरप्राप्‍तीसाठी तळमळीने प्रयत्न करणे : त्‍यांची ईश्‍वरप्राप्‍तीची तळमळही तीव्र आहे. त्‍यामुळेे ही मुले ईश्‍वरप्राप्‍तीसाठी सतत प्रयत्नशील असतात.

७. प्रेमभाव : दैवी बालकांमध्‍ये पुष्‍कळ प्रेमभाव आहे. ते स्‍वतःहून इतरांची विचारपूस करतात. सहसाधकांना पुष्‍कळ समजून आणि सांभाळून घेतात.

८. प्रामाणिकपणा : दैवी बालकांमध्‍ये प्रामाणिकपणा हा गुण प्रकर्षाने दिसून येतो. ते जे काही असेल, ते सत्‍संगात प्रामाणिकपणे मांडतात.

९. दैवी बालके थोरामोठ्यांचा आदर करतांना दिसतात.

१०. शिकण्‍याची वृत्ती : दैवी बालके संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आत्‍मसात करतात. एवढेच नाही, तर तसे आचरणात आणण्‍याचा प्रयत्न करून बालसत्‍संगात मांडतात.

११. सर्व दैवी बालसाधकांमध्‍ये परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती अपार भाव आणि दृढ श्रद्धा आहे.

‘हे गुरुदेवा, आपल्‍या कृपेमुळे दैवी बालकांच्‍या सत्‍संगामध्‍ये बसायला मिळाले आणि आपणच या अज्ञानी जिवाकडून हे सर्व लिहून घेतले. त्‍याविषयी मी तुमच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– कु. शार्दुल चव्‍हाण, कुडाळ, सिंधुदुर्ग. (२५.१.२०२२)