विद्यार्थ्‍यांनो, केवळ परीक्षार्थी न होता खरे विद्यार्थी बनण्‍याचा प्रयत्न करा ! – सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

मुझफ्‍फरपूर (बिहार) येथे हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन !

सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांचे मार्गदर्शन ऐकतांना ‘एशियन स्‍कूल’चे उपस्‍थित विद्यार्थी

मुझफ्‍फरपूर (बिहार) – सध्‍या बहुतांश विद्यार्थी एका वर्गातून दुसर्‍या वर्गात जाण्‍यालाच अभ्‍यास समजतात. त्‍यांच्‍यासाठी अभ्‍यासाची हीच व्‍याख्‍या आहे. अज्ञानामुळे मुले विद्यार्थी होण्‍याऐवजी परीक्षार्थी होत आहेत. केवळ परीक्षा उत्तीर्ण होणे एवढेच नाही, तर त्‍याहून मोठे झाल्‍यावर मिळालेल्‍या ज्ञानातून ज्ञानदान करणे, तसेच त्‍या ज्ञानाचा राष्‍ट्र आणि धर्म यांसाठी उपयोग करणे, हे आपले ध्‍येय असले पाहिजे. विद्यार्थ्‍यांनी केवळ परीक्षार्थी न होता खरे विद्यार्थी बनण्‍याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी मुझफ्‍फरपूरमधील ब्रह्मपुरा येथील ‘एशियन स्‍कूल’च्‍या विद्यार्थ्‍यांसाठी आयोजित कार्यक्रमात केले. या उपक्रमाचा लाभ १५८ विद्यार्थ्‍यांनी घेतला.

ते पुढे म्‍हणाले, ‘‘कोणत्‍या विषयाचा अभ्‍यास कोणत्‍या वेळी करायचा ? हे ठरवण्‍यासाठी वेळेचे नियोजन केले पाहिजे. त्‍यामुळे वेळ वाया जात नाही. एकाग्रता आणि आत्‍मविश्‍वास वाढावा, तसेच अभ्‍यास चांगला व्‍हावा, यासाठी अभ्‍यास चालू करण्‍यापूर्वी श्री गणेश आणि सरस्‍वतीदेवी यांना प्रार्थना केली पाहिजे. नामजप आणि प्रार्थना यांमुळे मनातील विचारांची संख्‍या न्‍यून होऊन मन अभ्‍यासावर केंद्रित रहाते.