खलिस्तानवाद्यांवर कठोर कारवाई करा !

पंतप्रधान मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना सुनावले !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – ‘जी-२०’ परिषदेला उपस्थित राहिलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी कॅनडामध्ये खलिस्तान्यांकडून भारतीय दूतावास आणि हिंदूंची मंदिरे यांवर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यास सांगितले. खलिस्तान्यांच्या कारवायांमुळे भारत आणि कॅनडा यांचीच हानी होत असल्याने अशा घटना रोखल्या पाहिजेत, अशी जाणीव पंतप्रधान मोदी यांनी ट्रुडो यांना करून दिली. या संदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. यात म्हटले आहे की, भारताने सरकार कॅनडातील ट्रुडो सरकारच्या धोरणाचा निषेध केला आहे.

(म्हणे) ‘काही जणांच्या अयोग्य कृतींमुळे सर्वांशी एकसारखा व्यवहार करता येणार नाही !’ – जस्टिन ट्रुडो

संपादकीय भूमिका

हे खरे असले, तरी जे ‘काही जण’ आहेत, त्यांच्यावर कॅनडा काहीच कारवाई करत नाही, याविषयी ट्रुडो का बोलत नाहीत ?

पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो म्हणाले की, कॅनडामध्ये शांततेत निदर्शने करण्याच्या स्वातंत्र्याचे आम्ही कायम रक्षण करू आणि द्वेषाला विरोध करण्यास नेहमीच सिद्ध राहू. काही लोकांच्या अयोग्य कृतींमुळे सर्वांशी एकसारखा व्यवहार करता येत नाही. आम्ही अशी प्रकरणे गंभीर्याने घेतो. आमचे सरकार खलिस्तानी आतंकवादाला कधीही प्रोत्साहन देणार नाही. काही लोकांच्या कारवाया संपूर्ण समुदाय किंवा कॅनडा यांच्या कारवाया असू शकत नाहीत. (ट्रुडो जे सांगत आहेत, त्यानुसार ते अद्यापपर्यंत का वागले नाहीत ?, हेही त्यांना सांगायला हवे होते ! – संपादक) ट्रुडो भारताविषयी म्हणाले की, भारत जगातील एक असामान्य आणि प्रमुख अर्थव्यवस्था आहे.