आता ब्राझिलकडे असणार ‘जी-२०’चे अध्यक्षपद !

‘जी-२०’ परिषदेचा समारोप

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व ब्राझिलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा

नवी देहली – येथील प्रगती मैदानावर बांधण्यात आलेल्या ‘भारत मंडपम्’ सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या २ दिवसांच्या ‘जी-२०’ परिषदेचा १० सप्टेंबर या दिवशी समारोप झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी उपस्थितांचे आणि ही परिषद पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार्‍या सर्वांचे आभार मानले. या वेळी त्यांनी ‘जी-२०’चे अध्यक्षपद ब्राझिलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा यांना सुपुर्द केले. यापूर्वी येथे ‘वन फ्युचर’ (एक भविष्य) नावाचे सत्र आयोजित करण्यात आले होते.

तत्पूर्वी सकाळी ‘जी-२०’मध्ये सहभागी झालेल्या देशांचे राष्ट्रप्रमुखांनी राजघाट येथे जाऊन म. गांधी यांच्या समाधीवर आदरांजली वाहिली. या वेळी  पंतप्रधान मोदी यांनी सर्व प्रमुखांना खादीची शाल देऊन त्यांचे स्वागत केले.