चीनच्या नेपाळमधील राजदूतांची भारतावर टीका
काठमांडू (नेपाळ) – दुर्दैवाने तुमच्या शेजारी भारतासारखा देश आहे; कारण भारत एक मोठी बाजारपेठ आहे. तुमच्याकडे याचा पुरेपूर लाभ उठवण्याची संधी आहे; मात्र त्याच वेळी भारताची नेपाळच्या प्रती आणि शेजारील देशांच्या प्रती नीती अधिक मैत्रीपूर्ण नाही आणि हे नेपाळसाठी लाभदायक नाही, असे संतापजनक विधान नेपाळमधील चीनचे राजदूत चेन सोंग यांनी केले. ते एका कार्यक्रमात बोलत होते. या वेळी नेपाळच्या संसदेच्या प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष देवराज घिमिरे उपस्थित होते.
चीन के राजदूत ने भारत को लेकर दिया ये बयान #China https://t.co/eGv9GLwSTN
— AajTak (@aajtak) September 5, 2023
१. सोंग यांनी दावा केला की, भारत आणि नेपाळ यांच्यातील विजेच्या संदर्भातील व्यापारातही घट झाली आहे. तसेच नेपाळ कृषी आयातीसाठी भारतावर अवलंबून आहे. अशा स्थितीत चीनच नेपाळसाठी अधिक भागीदार आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला.
२. चीनच्या राजदूतांच्या या विधानांवर नेपाळमधील काही तज्ञांनी टीका केली आहे. त्यांनी पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्याकडे राजदूतांना समज देण्याची मागणी केली आहे. ‘कोणत्याही राजदूताला अशी विधाने करणे शोभा देत नाही’, असे त्यांनी म्हटले आहे.
संपादकीय भूमिका
|