|
अथेन्स (ग्रीस) – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २५ ऑगस्ट या दिवशी युरोपमधील देश ग्रीसच्या दौर्यावर पोचले. त्यांनी ग्रीसच्या राष्ट्रपती कॅटरीना एन्. सकेलारोपोलू यांची भेट घेतली.
४० वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान ग्रीसला भेट देत आहेत. यापूर्वी वर्ष १९८३ मध्ये इंदिरा गांधी ग्रीसला गेल्या होत्या. पंतप्रधान मोदी यांच्या समवेत १२ भारतीय उद्योगपतीही ग्रीसला गेले आहेत. त्यांची ग्रीसमधील एका व्यावसायिकाशी बैठक होणार आहे, तसेच दोन्ही देशांमधील व्यापार, तंत्रज्ञानापासून संरक्षण सहकार्यापर्यंत, सर्व विषयांवर चर्चा होणार आहे. ग्रीस अनेक दिवसांपासून भारताचे ‘ब्रह्मोस’ ‘क्रूझ’ क्षेपणास्त्र खरेदी करण्यात रस दाखवत आहे. या संदर्भात पंतप्रधान मोदी या दौर्यात क्षेपणास्त्रविक्रीचा करार करू शकतात.
40 साल में ग्रीस पहुँचने वाले पहले प्रधानमंत्री बने मोदी, जानिए उनकी ये यात्रा क्यों है बेहद खास; क्या यूनान बनेगा यूरोप का एंट्री प्वॉइंट#PMModiInGreece #PMModi #PMModiGreeceVisit https://t.co/SkDCR9WEUe
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 25, 2023
पंतप्रधान मोदी ग्रीसला जाण्यामागील रणनीती !
काश्मीर प्रश्नावर भारताच्या विरोधात जाऊन तुर्कीये पाकिस्तानला पाठिंबा देत आहे. ग्रीस हा तुर्कीयेचा शेजारी देश आहे. या दोघांमध्ये शत्रूत्व आहे. ग्रीसने काश्मीर प्रश्नावर भारताला पाठिंबा दिला आहे. ग्रीसदेखील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या स्थायी जागेचा समर्थक आहे. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या धोरणानुसार भारतीय वायूदलाचे प्रमुख व्ही.आर्. चौधरी गेल्या वर्षी ऑगस्ट मासामध्ये ग्रीसला गेले होते. एप्रिल २०२३ मध्ये तुर्कीयेने पाकिस्तानला ‘बायरक्तार टीबी २’ हे ड्रोन दिले. या ड्रोनने रशिया-युक्रेन युद्धात मोठी कामगिरी करून केली आहे. पाकिस्तानला हे ड्रोन मिळणे भारतासाठी धोकादायक आहे.