२६ ऑगस्टला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांचा रत्नागिरीत जाहीर सत्कार !

‘हिंदु धर्मावरील आघातांवर उपाय-हिंदु राष्ट्र’ या विषयावर होणार व्याख्यान

रत्नागिरी, २४ ऑगस्ट (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्र निर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी देशभरात प्रवास करून हिंदूंमध्ये जागृती आणि त्यांचे संघटन करणारे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांना अलीकडेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते देहली नोएडा येथे ‘सांस्कृतिक योद्धा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या राष्ट्र-धर्म विषयक कार्याची दखल घेऊन सकल हिंदु समाज रत्नागिरीच्या वतीने श्री. रमेश शिंदे यांचा २६ ऑगस्ट २०२३ या दिवशी शहरातील माळनाका येथील जयेश मंगल पार्क येथे सायंकाळी ६ वाजता जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. या वेळी श्री. शिंदे यांचे ‘हिंदु धर्मावरील सर्व आघातांवर उपाय-हिंदु राष्ट्र’ या विषयावर व्याख्यानही होणार आहे.

श्री. रमेश शिंदे यांनी स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेतले आहे. त्यांनी भारतीय वायूदलाच्या गृहनिर्माण विभागात काही वर्षे सेवा केली आहे. त्यांना सनातन धर्मभूषण, हिंदु कुलभूषण, सांस्कृतिक योद्धा आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते पूर्णवेळ धर्मप्रचारक म्हणून देशभर प्रवास करतात. धर्म आणि राष्ट्र यांच्या संदर्भात विविध क्षेत्रांतील विषयावरील अभ्यासू व्याख्याते आणि वृत्तपत्रांतील स्तंभलेखक म्हणूनही ते ओळखले जातात. अनेक राष्ट्रीय दूरचित्रवाहिन्यांवरील चर्चासत्रात त्यांनी हिंदु धर्माची बाजू प्रभावीपणे मांडली आहे. त्यांनी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘हलाल जिहाद’ या समस्यांच्या संदर्भातील पहिला अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला आहे. याशिवाय सनातनच्या काही ग्रंथांचे ते संकलकही आहेत.

‘रत्नागिरी येथे २६ ऑगस्ट या दिवशी होणार्‍या त्यांच्या या सत्कार सोहळ्यास आणि व्याख्यानासाठी हिंदूंनी बहुसंख्येने उपस्थित रहावे’ असे आवाहन सकल हिंदु समाज, रत्नागिरीच्या वतीने चंद्रकांत राऊळ (संपर्क क्र. ९८३४१०७६५२), अभय दळी (संपर्क क्र. ९५११६७५४२२) आणि (संपर्क क्र. संजय जोशी ८९८३२६५७५९) यांनी केले आहे.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांना ‘सांस्कृतिक योद्धा’ पुरस्कार प्रदान !