केंद्रीय मंत्र्यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावली !

२ अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद

नाशिक – शहरातील आर्.टी.ओ. रस्ता परिसरात केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची माळ २ अज्ञातांनी हिसकावली. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास भारती पवार यांच्या आई भाजी खरेदीसाठी घराबाहेर पडल्या. तेव्हा वरील प्रकार घडला. पोलीस सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

संपादकीय भूमिका

नाशिक येथे कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा !