‘चंद्रयान-३’चा ‘लँडर विक्रम’ चंद्रापासून अवघ्या २५ किलोमीटर दूर !

बेंगळुरू (कर्नाटक) – भारताच्या ‘चंद्रयान-३’च्या ‘लँडर विक्रम’ने पुन्हा एकदा त्याची गती न्यून करण्यास यश मिळावले आहे. आता ते चंद्रापासून केवळ २५ किलोमीटर अंतरावर फेर्‍या मारत आहे. येत्या २३ ऑगस्टला सायंकाळी ५.४७ वाजता ते चंद्रावर उतरणार आहे. २ दिवसांपूर्वी लँडर विक्रमने त्याची गती काही प्रमाणात न्यून केली होती.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) ट्वीट करून सांगितले की, आता लँडर विक्रमची अंतर्गत तपासणी केली जाईल.