उत्तराखंडमध्ये मुसलमान विक्रेते ओळख लपवून करत आहेत फळांच्या रसाची विक्री !

चौकशी करून कारवाई करण्याची हिंदु जनजागरण मंचची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडच्या लक्सर येथे हिंदु जनजागरण मंचकडून उपविभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. फळांच्या रसाची विक्री करणारे मुसलमान स्वतःची ओळख लपवून व्यवसाय करत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. हे विक्रेते फळांच्या रसामध्ये रसायन मिळत असल्याचा आरोपही यात करण्यात आला आहे.

लक्सरचे हिंदु जागरण मंचचे जिल्हाध्यक्ष जोधसिंह पुंडीर आणि व्यापारी नेते अजय वर्मा यांच्या नेतृत्वखाली निवेदन देण्यात आले. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, बाहेरून आलेले लोक त्यांच्या दुकानांना शहरांची नावे किंवा अन्य नावे देऊन स्वतःची ओळख लपवत आहेत. त्यांच्याकडून विकल्या जाणार्‍या फळांच्या रसांची तपासणी करण्यात यावी. तसेच या विक्रेत्यांची खरी ओळख उघड करण्यात यावी.

संपादकीय भूमिका

फळांचा रस विकण्यासाठी ओळख का लपवावी लागते ?’, हे देशातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी सांगतील का ?