धुळे येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त १ सहस्र १०० मीटर राष्ट्रध्वजाच्या मिवणुकीचे आयोजन !

धुळे – भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने येथे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली १ सहस्र १०० मीटर राष्ट्रध्वजाच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील अग्रेसर पुतळा येथून या मिरवणुकीस आरंभ होऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला.

या मिरवणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या अभियानाच्या पार्श्वभूमीवर माती आणि हिंदु संस्कृतीचे प्रतीक असलेल्या तुळशीची मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीमध्ये देण्यात आलेल्या देशभक्तीवरील घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.