उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – अयोध्येतील शाहनवाज नावाच्या एका मुसलमान व्यक्तीने तो हिंदु असल्याचे भासवून मालती नावाच्या हिंदु महिलेशी विवाह केला. पीडित महिला विधवा असून २ मुलांची आई आहे. लग्नानंतर काही दिवसांनी शाहनवाज याने तिच्या मुलाची सुंता करण्याचा प्रयत्न केला. पती मुसलमान असल्याचे समजल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात धर्मांतराच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.
Love Jihad in UP: Shahnawaz poses as Dilip to lure a Hindu mother of two to marry him; forces her son to undergo circumcisionhttps://t.co/2wWeUwQkRw
— OpIndia.com (@OpIndia_com) August 16, 2023
१. पीडित महिला पती आणि दोन मुले यांच्यासह मुंबई येथे रहात होती. पतीचा मृत्यू झाल्यानंतर शेजारीच रहाणार्या आरोपी शाहनवाज याने तिच्याशी मैत्री केली. त्याने स्वत:ची ओळख दिलीप अशी करून दिली आणि तो हिंदु असल्याचे खोटेच सांगितले. त्यानंतर दोघांनी तेथील एका मंदिरात लग्न केले.
२. हे कुटुंब नुकतेच अयोध्येतील भग्गू जलालपूर येथे त्यांच्या मूळ गावी आले. गावात पोचताच शाहनवाजने पीडित महिलेशी बलपूर्वक इस्लामी पद्धतीने लग्न केले आणि ‘तुला इस्लामी रितीरिवाजानुसार जगावे लागेल’, असे सांगितले.
३. हिंदु महिलेला तिची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी आरोपीला कह्यात घेऊन अन्वेषण चालू केले आहे. पीडित महिला सध्या गोरखपूरमध्ये तिच्या माहेरी रहाते.