‘सध्या देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त होत असलेल्या ज्ञानात ‘नवनवीन शब्द आणि त्यांचे अर्थ’ प्राप्त होत असतात. हे शब्द कुठल्याही ग्रंथांत नाहीत किंवा त्याविषयी मी कधी ऐकलेले नसते. या संदर्भात सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाद्वारे प्राप्त झालेले विश्लेषण पुढे दिले आहे.
१. सूक्ष्मातील मूळ ‘संस्कृत’ भाषेतील ज्ञान ‘मराठी’ भाषेत मिळण्याच्या संदर्भातील सूक्ष्म प्रक्रिया
अ. सरस्वतीदेवीचे ज्ञानासंबंधीचे ‘शुद्ध सत्त्वकण’ वातावरणात असतात. या शुद्ध सत्त्वकणांत ‘संस्कृत’ भाषेतील ज्ञान समाविष्ट असते.
आ. ज्ञानप्राप्तकर्त्या साधकाची भाषा ‘मराठी’ असल्याने विविध विषयांतील ‘संस्कृत’ भाषेतील ज्ञानाचे रूपांतर ‘मराठी’ भाषेत होते, तेव्हा ज्ञानासंबंधीच्या ‘शुद्ध सत्त्वकणां’चे रूपांतर ‘सत्त्व कणांत’ होते.
२. सूक्ष्मातील ज्ञानासंबंधीच्या भाषेचे प्रकार
२ अ. अनादि भाषा : अनादि काळापासून सूक्ष्मात ‘अनंत शब्द आणि त्यांचे अनंत अर्थ’ दडलेले आहेत. तिला ‘अनादि भाषा’, असे म्हणतात.
२ आ. प्राचीन भाषा : ‘सत्य’, ‘त्रेता’, ‘द्वापर’ या युगांनुरूप उपयोगी शब्द सूक्ष्मातून त्या त्या वेळी कार्यान्वित होत असतात. त्यामुळे ‘युगे आणि काळ’ यांनुरूप ‘भाषेतील शब्द आणि त्यांचे स्वरूप’ यांत पालट होत जातो. त्या भाषेला ‘प्राचीन भाषा’, असे म्हटले आहे.
२ इ. प्रचलित भाषा : कलियुगात, म्हणजे सध्या उपयोगात येत असलेले ‘भाषेतील शब्द आणि त्यांचे अर्थ’ हे ‘प्रचलित भाषेच्या’ अंतर्गत येतात.
३. सूक्ष्मातून ज्ञान मिळवतांना ज्ञानप्राप्तकर्त्या साधकाला ‘नवनवीन शब्द आणि त्यांचे अर्थ’ सुचण्यामागील कारण
एखाद्या विषयी सूक्ष्मातून ज्ञान मिळवतांना सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्याची ‘ज्ञान मिळवण्यातील एकाग्रता अधिक असणे आणि सूक्ष्म जाणण्याच्या क्षमतेत वाढ होणे’ यांमुळे त्याला सध्या प्रचलित असलेल्या भाषेनुसार ज्ञान न मिळता कधीकधी ‘प्राचीन भाषे’च्या संदर्भातील त्या त्या विषयातील ‘मूळ शब्द आणि त्यांचे अर्थ’ प्राप्त होतात. त्यामुळे हे शब्द ‘ज्ञानप्राप्तकर्ता साधक आणि समाज’, यांसाठी नवीन असतात.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.४.२०२२)
|