आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंदही आहे; पण यासमवेतच भारताचे विभाजन आणि त्या वेळी लक्षावधी हिंदु बांधवांच्या नरसंहाराची वेदनाही आहे. आम्हाला भारताला हिंदु राष्ट्र बनवून अखंड भारताच्या निर्मितीचा संकल्प करावा लागेल. आजचे स्वराज्य अपूर्ण आहे. आता स्वदेशीच्या माध्यमातून सुराज्यापर्यंत अर्थात् हिंदु राष्ट्राकडे जाण्यासाठी आपल्याला संकल्प करावा लागेल. आपली व्यवस्था, राज्यव्यवस्था, कायदे, शिक्षणव्यवस्था, भाषा इत्यादींच्या माध्यमातून आपल्याला परत स्वराज्यातून सुराज्याकडे वळावे लागेल.
आपले प्राचीन भारतीय शिक्षण, न्यायव्यवस्था, राज्यव्यवस्था, वैद्यकशास्त्र, वास्तूशास्त्र आदी प्रगत आणि विश्इंग्रज यांनी जेवढी भारताची हानी केली नसेल, तेवढी हानी डाव्या विचारधारेच्या लोकांनी ७५ वर्षांत केली आहे. आता डाव्या विचारांच्या टोळ्या भारताचे तुकडे करण्यासाठी सरसावल्या आहेत. या विरोधात हिंदूंनी सत्य इतिहास अन् संस्कृती जाणून घेऊन संघर्ष करण्यास सज्ज झाले पाहिजे.
– (सद़्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती