कुकी समुदायातील जमावाने सामूहिक बलात्कार केल्याची मणीपूरमधील महिलेची तक्रार

इंफाळ – मणीपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील चुराचंदपूर येथे एका महिलेने तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार नोंदवली आहे. मणीपूरमध्ये वांशिक संघर्ष चालू झाला, त्या कालावधीत कुकी समुदायातील जमावाने आक्रमण करून चुराचंदपूर येथील महिलेच्या घराला आग लावली होती. त्यावेळी घाबरून पीडित महिलेने स्वतःची दोन मुले, वहिनी आणि भाची यांच्यासह घरातून पळ काढला; मात्र ती धावत असतांना पडली. तिने तिच्या वहिनीला मुलांसह पुढे जाण्यास सांगितले. त्यांचा पाठलाग करणार्‍या कुकी समुदायातील ५ – ६ जणांच्या गटाने तिला पकडून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नंतर त्यांच्यामध्ये कुकी समुदायातील अन्यही लोक सामील झाले होते, असे पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जेव्हा पीडित महिला शुद्धीवर आली तेव्हा ती मैतई समुदायातील एका घरात होती.

तक्रार करायला दोन महिने का घेतले ?

‘पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी २ महिने का घेतले ?’, याविषयी स्पष्टीकरण देतांना महिला म्हणाली, ‘‘बलात्कार  झाल्याचे उघडपणे सांगणे हे समाजात ‘कलंक’ म्हणून पाहिले जाते. ‘समाज माझ्यावर बहिष्कार घालेल’, अशी भीती असल्याने, स्वतःची आणि माझ्या कुटुंबाची अब्रू वाचवण्यासाठी मी आधी काही सांगितले नाही.’’

संपादकीय भूमिका

मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी समुदायातील महिलेवर अत्याचार झाल्याचा टाहो फोडणार्‍या भारतासह जगभरातील कथित निधर्मीवादी आणि ख्रिस्ती यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?