मुंबई – यापुढे मंत्रालयात नियमितपणे कामकाजाला प्रारंभ होण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगितला जाणार आहे. ९ ऑगस्ट या क्रांतीदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या स्तुत्य उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला.
सौजन्य टीव्ही 9 मराठी
मंत्रालयाच्या कामकाजाला प्रारंभ होण्यापूर्वी सकाळी १०.४५ वाजता छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाविषयीची माहिती मंत्रालयाच्या सर्व विभागांमध्ये २-३ मिनिटे ऐकवली जाणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने हा उपक्रम वर्षभर राबवला जाणार आहे.
संपादकीय भूमिकामहाराष्ट्र शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! राज्यातील शाळांमध्येही अशा स्वरूपाचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास रुजवायला हवा ! |