दीड वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍या इस्माईलला मृत्यूदंड !

सुरत (गुजरात) – सुरत जिल्हा न्यायालयाने २ ऑगस्ट २०२३ या दिवशी दिलेल्या एका ऐतिहासिक निकालात दीड वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी दोषी ठरलेल्या इस्माईल उपाख्य यूसुफ सलीम (वय २३ वर्षे) याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. बलात्काराची घटना उघडकीस येताच सरकार, प्रशासनापासून पोलिसांपर्यंत  सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. अवघ्या ११ दिवसांत आरोपीच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले. ३१ जुलै २०२३ या दिवशी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सर्व पुराव्यांच्या आधारे आरोपी इस्माईलला दोषी ठरवले होते. त्यानंतर २ ऑगस्ट २०२३ हा दिवस शिक्षेसाठी निश्‍चित करण्यात आला होता.

संपादकीय भूमिका 

वासनांध धर्मांध ! अशांच्या विरोधात अबू आझमी, ओवैसी यांच्यासारखे नेते कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !