‘ऑनलाईन’ सत्‍संगांना उपस्‍थित राहिल्‍यामुळे चेन्‍नई येथील सौ. सुचित्रा बद्रीकण्‍णन्‍न यांना आलेल्‍या अनुभूती आणि त्‍यांना जाणवलेले पालट

सनातन संस्‍थेच्‍या साप्‍ताहिक ‘ऑनलाईन’ साधना सत्‍संगांना नियमितपणे जोडणार्‍या चेन्‍नई येथील सौ. सुचित्रा यांना आलेल्‍या अनुभूती आणि त्‍यांना जाणवलेले पालट त्‍यांच्‍याच शब्‍दांत पुढे दिले आहेत.

सौ. सुचित्रा बद्रीकण्‍णन्‍न

१. पूर्वी श्री विठ्ठलाच्‍या संदर्भात अनेक प्रवचने ऐकली असली, तरी पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी केलेले श्री विठ्ठलाचे गुणवर्णन ऐकतांना पुष्‍कळ चैतन्‍य जाणवणे आणि अपूर्व आनंद अन् शांती अनुभवता येणे : ‘एकदा पू. (सौ.) उमा रविचंद्रन् घेत असलेल्‍या भावसत्‍संगात त्‍यांनी श्री विठ्ठलाचे गुणवर्णन केले. ते ऐकतांना मला पुष्‍कळ चैतन्‍य जाणवत होते. या पूर्वी मी अनेकदा श्री विठ्ठलाच्‍या संदर्भात झालेली प्रवचने ऐकली होती आणि मला ती पुष्‍कळ आवडलीही होती; मात्र या भावसत्‍संगात मला अनुभवायला मिळालेला आनंद आणि शांती अपूर्व होती. सत्‍संगानंतर दुसर्‍या दिवशीही मी ती आनंदावस्‍था अनुभवत होते.

२. सत्‍संगात घेतलेल्‍या सूक्ष्मातील प्रयोगाच्‍या वेळी भगवान दत्तात्रेयांचे दर्शन होणे : एका सत्‍संगात उपस्‍थित जिज्ञासूंकडून सूक्ष्मातील प्रयोग करून घेण्‍यात आला. त्‍या वेळी मला सूक्ष्मातून भगवान दत्तात्रेयांचे दर्शन झाले. तसेच ‘माझ्‍यावरील त्रासदायक आवरण नष्‍ट होत आहे’, असे जाणवले. मला दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाण्‍याची सवय आहे. त्‍यामुळेच ‘माझ्‍यावर आवरण आले होतेे’, असे मला वाटते. ‘दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पाहिल्‍यामुळे स्‍वतःभोवती त्रासदायक आवरण येते’, याची मला जाणीव झाली आहे; मात्र मला ते बघणे बंद करता येत नाही. त्‍या स्‍वभावदोषावर मात करण्‍यासाठी मी स्‍वंयसूचना देत आहे.

३. सत्‍संगामुळे निराशा आणि अनावश्‍यक विचार यांचे प्रमाण उणावणे : सत्‍संगाला नियमित उपस्‍थित राहिल्‍यामुळे मला आलेली निराशा आणि अनावश्‍यक विचार यांचे प्रमाण पुष्‍कळ उणावले आहे. माझ्‍या मनात येणार्‍या अनावश्‍यक विचारांविषयीची जागरूकता वाढली आहे. त्‍यामुळे जेव्‍हा माझ्‍या मनात अनावश्‍यक विचार येतात, तेव्‍हा मी नामजप करायला आरंभ करते.

४. सासर्‍यांनी पूर्वजांसाठी श्राद्ध आणि तर्पण विधी करणे : मी साधनेविषयी काही सूत्रे सांगितल्‍यास माझे सासरे ते ऐकत नाहीत; मात्र या वर्षी त्‍यांनी महालय काळात पूर्वजांसाठी श्राद्ध आणि तर्पण विधी केला. या पूर्वी त्‍यांनी कधीही तो विधी केला नव्‍हता.

या अनुभूतींमुळे ‘प्रत्‍यक्ष ईश्‍वरच साप्‍ताहिक सत्‍संगांच्‍या माध्‍यमातून मला मार्गदर्शन करत आहे’, याची मला जाणीव होत आहे.

– सौ. सुचित्रा बद्रीकण्‍णन्‍न, चेन्‍नई, तमिळनाडू. (२.२.२०२२)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.