(म्हणे) ‘योगी आदित्यनाथ यांना वाटले, तर ते ज्ञानवापीवर बुलडोजर चालवतील !’ – असदुद्दीन ओवैसी

असदुद्दीन ओवैसी यांची गरळओक !

भाग्यनगर (तेलंगाणा) – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना वाटले, तर ते ज्ञानवापीवर बुलडोजर चालवतील, असे विधान एम्.आय.एम्.चे येथील खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी योगी आदित्यनाथ यांच्या ज्ञानवापीविषयीच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना केले.
असदुद्दीन ओवैसी पुढे म्हणाले की, धार्मिक प्रकरण जेव्हा न्यायालयात चालू असेल, त्यावर कोणतेही विधान करणे, हे घटनाविरोधी आहे. मुख्यमंत्र्यांनी कायद्याचे पालन केले पाहिजे; मात्र ते मुसलमानांवर दबाव टाकण्याचे काम करत आहेत. मुसलमान पक्षाकडून हे प्रकरण उच्च न्यायालयात नेण्यात आले आहे, ज्यावर १-२ दिवसांत निर्णय येणार आहे. अशा वेळी अशा प्रकारचे विधान करणे; म्हणजे द्वेष पसरवणारे आहे. हा प्रश्‍न हिंदु आणि मुसलमान असा नसून ‘मुख्यमंत्री कायदा मानणार आहेत कि नाही ?’, असा आहे. पंतप्रधानपदाचे स्वप्न पहाणारे योगी आदित्यनाथ यांना निर्णय घ्यायला हवा की, ते देशाला १०० वर्षे पुढे घेऊन जाऊ इच्छित आहे की, ४०० वर्षे मागे घेऊन जाऊ इच्छित आहेत. (ज्ञानवापीचा प्रश्‍न सोडवणे, हा देशाला पुढे नेण्याचाच एक भाग आहे, तर ज्ञानवापी हिंदूंना देण्यास नाकारणे म्हणजे देशाला ४०० वर्षे मागे नेणे होय, हे आवैसी लक्षात घेणार नाहीत ! – संपादक) 

संपादकीय भूमिका 

औरंगजेब आणि अन्य मुसलमान आक्रमक यांनी काही शतकांपूर्वी हिंदूंच्या मंदिरांवर आघात करून ते पाडले आणि तेथे मशिदी बांधला, हा इतिहास ओवैसी का सांगत नाहीत आणि तो मान्य का करत नाहीत ?