भंडारा येथे जनित्रात साप अडकल्‍याने विद्युत्‌पुरवठा बंद !

२ दिवस ग्रामस्‍थ पाण्‍यापासून वंचित

भंडारा – विद्युत्‌पुरवठा करणार्‍या नदीवरील डीपीतील जनित्रात मोठा साप अडकून पडल्‍याने विद्युत्‌पुरवठा बंद होता. त्‍यामुळे २ दिवस येथील बारव्‍हा ग्रामस्‍थांना नळाचे पाणीच मिळाले नाही. ग्रामपंचायतीच्‍या पाणीपुरवठा कर्मचार्‍यांनी तपासणी केल्‍यावर जनित्रात साप अडकल्‍याचे लक्षात आले. विद्युत् विभागाच्‍या कर्मचार्‍यांनी सापाला हटवले.