‘स्ट्रोक’ची लक्षणे जाणून घेणे आणि जलद कृती करणे याचा अर्थ जीवन अन् अपंगत्व किंवा मृत्यू यांमध्ये मोठे अंतर निर्माण करणे होय. पक्षाघाताचा झटका आल्यानंतर तुम्ही वैद्यकीय साहाय्य मिळवण्यासाठी विलंब केल्यास कायमचे अपंगत्व किंवा मृत्यू याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.
स्ट्रोकची लक्षणे जाणून घ्या !
- शरिराच्या एका बाजूला विशेषत: चेहरा, हात किंवा पाय यांमध्ये सुन्नपणा अथवा अशक्तपणा जाणवणे.
- अचानक बोलण्यात अडचण येणे किंवा बोलणे समजण्यात गोंधळ होणे.
- अचानक एका डोळ्यात किंवा दोन्ही डोळ्यांनी पहाण्याची समस्या निर्माण होणे.
- अचानक चक्कर येणे, तोल किंवा समन्वय गमावणे किंवा चालतांना त्रास होणे.
- कोणत्याही कारणाविना अचानक तीव्र डोकेदुखी होणे.
इतर धोक्याच्या लक्षणांमध्ये दुहेरी दृष्टी, झोप येणे, मळमळ किंवा उलट्या होणे यांचा समावेश होतो. यापैकी कुठलेही लक्षण आढळल्यास त्वरित वैद्यकीय साहाय्य घेणे महत्त्वाचे आहे.
पक्षाघाताचा झटका आलेली व्यक्ती जितक्या लवकर रुग्णालयामध्ये पोचेल, तितक्या लवकर तिच्यावर प्रभावी उपचार होऊ शकतो.
चेहरा : हसतांना चेहर्याची एक बाजू ढासळते का ?
हात : दोन्ही हात उंचावल्यास एक हात खाली वाकतो का ?
भाषा : एखाद्या साध्या वाक्याची पुनरावृत्ती करतांना भाषा अस्पष्ट होते का ?
(संदर्भ: सामाजिक माध्यम)
तुम्हाला किंवा तुमच्या परिचयातील एखाद्या व्यक्तीमध्ये वरील लक्षणे आढळल्यास विलंब न करता वैद्यकीय सल्ला घ्या.