विधानसभेच्‍या विरोधीपक्ष नेतेपदी काँग्रेसचा दावा !

मुंबई – अजित पवार यांनी सत्तेत असलेल्‍या भाजप-शिवसेना यांना पाठिंबा दिल्‍यामुळे विरोधी पक्षातील राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या आमदारांची संख्‍या घटली आहे. त्‍यामुळे अजित पवार यांनी त्‍यागपत्र दिल्‍यामुळे रिक्‍त झालेल्‍या विरोधी पक्ष नेतेपदावर काँग्रेसने दावा केला आहे.

विरोधी पक्षामध्‍ये राष्‍ट्रवादी काँग्रेसचे ५३, काँग्रेसचे ४५, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे १७ आमदार असे पक्षीय बलाबल होते. यांतील राष्‍ट्रवादी काँग्रेसमधील ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यांसह राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या आणखी काही नेत्‍यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. त्‍यामुळे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे संख्‍याबळ आणखी न्‍यून होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे विरोधी पक्षात काँग्रेस पक्षाचे संख्‍याबळ सर्वाधिक ठरत आहे.अजित पवार यांच्‍या त्‍यागपत्रानंतर विरोधी पक्षनेते पदासाठी जितेंद्र आव्‍हाड यांचे नाव घेण्‍यात येत आहे. यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे द्यायचे ? हा निर्णय महाविकास आघाडी पक्षाला एकत्रित घ्‍यावा लागणार आहे.