फ्रान्ससारख्या देशांनी अल्प मजुरीचे कामगार म्हणून कट्टरतावाद्यांना त्यांच्या देशात नेल्याने होत आहे हिंसाचार !

  • मौलाना इमाम तौहिदी यांचा २ वर्षांपूर्वीचा व्हिडिओ होत आहे प्रसारित !

  • इस्लामी देशांमध्ये कट्टरतावाद्यांवर कठोर कारवाई होत असल्याने तेथे आतंकवादी कारवाया होत नसल्याचाही केला दावा !

(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

मौलाना इमाम तौहिदी

पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्समधील धर्मांध मुसलमानांच्या हिंसाराचाराच्या पार्श्‍वभूमीवर मौलाना इमाम तौहिदी यांचा सप्टेंबर २०२० चा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात त्यांनी युरोप आणि पाश्‍चात्त्य देश यांना इस्लामी कट्टरतावाद्यांच्या संदर्भात सतर्क केले होते. कट्टरतावादी विस्थापित मुसलमान हे अल्प पैशांमध्ये मजुरी करत असल्याने फ्रान्ससारख्या देशांनी स्वार्थापोटी त्यांना देशात आश्रय दिल्याने तेथे हिंसाचार होत आहे, अशी टीका त्यांनी केली.

१. इमाम तौहिदी यांनी म्हटले की, जिहादी आतंकवादाला इस्लामी देशांत आणि मुसलमानेतर देशांत कारवाया करून राबवले जाते.

२. ‘इस्लामिक रेवोल्यूशनरी गार्ड कोर’ ही इराण येथील सशस्त्र संघटना सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात या इस्लामी देशांत कार्य करू शकत नाही किंवा तिचे बँक खातेही उघडू शकत नाही. तसेच इस्लामी संघटना हिजबुल्ला, मुस्लिम ब्रदरहुड आदी बहरीन, ओमान, अबू धाबी आदी देशांमध्ये काम करू शकत नाहीत. याच संघटना ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आदी देशांमध्ये सहजरित्या बँक खाती उघडू शकतात आणि कार्य करू शकतात.

३. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी नुकतेच म्हटले होते, ‘इस्लामी देश संकटात आहेत.’ मला वाटते की, आमच्याकडे (इस्लामी देशांकडे) बोको हराम, अल कायदा आणि  तालिबान यांसारख्या समस्या आहेत; मात्र दुबई, अबू धाबी, बहरीन, कुवेत या देशांमध्ये या संघटना नसल्याने तेथे कोणतीही समस्या नाही. हे इस्लामी देश प्रगती करत आहेत. त्यामुळे मॅक्रॉन यांचाच देश संकटात आहे. तुम्ही इस्लामी देशांकडे जाता आणि तेथील कचरा (कट्टरतावादी मुसलमान) घेऊन येता. अशा कचर्‍याला (कट्टरतावादी मुसलमानांना) इस्लामी देश कारागृहात टाकू इच्छित असतात किंवा समाजापासून दूर ठेवू इच्छित असतात. तुम्ही (मॅक्रॉन) अशा लोकांना कमी मजुरीमधील कामगार मिळण्याच्या लालसेने तुमच्या देशांत घेऊन येता; मात्र हे कट्टरतवादी तुमच्या देशात आल्यावर कोणतेही काम करू इच्छित नाहीत. ते तुमच्या देशांतील विनामूल्य मिळणार्‍या कल्याणकारी योजनांचा लाभ उठवू इच्छित असतात. ते फ्रान्सच्या महिलांशी विवाह करू इच्छितात. त्यांना काम करण्यासाठी वेळ नसतो.

४. दुसरीकडे पोलंडसारख्या देशाने एकदाही इस्लामी कट्टरतावादविषयी तक्रार केलेली नाही. तेथे आतापर्यंत एकही जिहादी आतंकवादी आक्रमण झालेले नाही. त्यांना मुसलमान विस्थापितांच्या समस्येविषयी ठाऊक झाल्यावर ते त्यांच्यावर कारवाई करतात. त्यांचे धोरण चांगले आहे.

संपादकीय भूमिका

यातून कट्टरतावादी मुसलमानांच्या समस्येचे मूळ कारण काय आहे, हे लक्षात येते !