गुजरात उच्च न्यायालयाकडून तिस्ता सेटलवाड यांना पोलिसांना शरण जाण्याचा आदेश !

जामीन अर्ज फेटाळला !

कर्णावती (गुजरात) – गुजरात उच्च न्यायालयाने तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचा जामीन अर्ज फेटाळत यांना पोलिसांना शरण जाण्याचा आदेश दिला.

तिस्ता सेटलवाड यांच्यावर वर्ष २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीमध्ये निर्दोष व्यक्तींना खोट्या गुन्ह्यांत अडकवल्याचा आरोप आहे. २५ जून २०२२ या दिवशी त्यांना अटक करण्यात आली होती. सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांना जामीन संमत करण्यात आला होता.