ब्रुसेल्स (बेल्जियम) – युरोपमधील बेल्जियम देशातील अनेक चर्च आता उपाहारगृह, नाईट क्लब, कॅफे, व्यापारी संकुल आदींमध्ये रूपांतरित होत आहेत. येथील फ्रांसिस्कन चर्च आता एक पंचतारांकित उपाहारगृह झाले आहे. ही स्थिती ख्रिस्ती धर्मियांच्या संख्या ५५ टक्क्यांपर्यंत घसरल्याने निर्माण झाली आहे. त्यातीलही केवळ १० टक्के ख्रिस्ती चर्चमध्ये जातात. जेव्हा देशात ८३ टक्के ख्रिस्ती होते, तेव्हा देशातील ३०० भागांमध्ये अनेक चर्च होते.
कभी क्रिश्चियनिटी का बोलबाला, अब ईसायत को मानने वाले 55% ही बचे: होटल, नाइट क्लब और कैफे में बदल रहे बेल्जियम के चर्च#Belgiumhttps://t.co/PRWlDabzPn
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 1, 2023
ख्रिस्त्यांमधील धर्माप्रती असणारी श्रद्धा अल्प होत असल्याने त्यांनी चर्चमध्ये जाणे बंद केले आहे, तसेच मोठमोठ्या चर्चची देखभाल करणेही कठीण होऊ लागले आहे. त्यामुळे त्यांचे रूपांतर उपाहारगृह, व्यापारी संकुल आदींमध्ये केला जात आहे. तथापि काही जण याला विरोध करत आहेत.
संपादकीय भूमिकाजगातील अनेक ख्रिस्ती देशांमध्ये ख्रिस्त्यांची त्यांच्या धर्मावरील श्रद्धा अल्प होत असल्याने चर्च ओस पडू लागली आहेत, तर भारतात ख्रिस्ती मिशनरी गोरगरीब हिंदूंना आमिष दाखवून त्यांना ख्रिस्ती बनवत आहेत ! |